PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

दिक्षा पाटील | Updated: May 4, 2023, 11:12 AM IST
PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला title=
(Photo Credit : Social Media)

Ponniyin Selvan 2 box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन:  2’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. चित्रपटानं प्रदर्शनाच्या तीन दिवसात 100 कोटींची कमाई केली. 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यानं पाच दिवस बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर  सहाव्या दिवशी चित्रपटानं काही चांगली कमाई केली नाही. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई ही मंदावली आहे. 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘पोन्नियिन सेल्वन:  2’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. पण अचानक आता चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कमी झाली आहे. 

सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, ‘पोन्नियिन सेल्वन:  2’ नं प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच काल बुधवारी 3 मे रोजी 8 कोटींची कमाई केली. तर मंगळवारी चित्रपटानं 10.5 कोटींची कमाई केली होती. आता हे आकडे पाहता, 122.25 कोटी झाली आहे.  ‘पोन्नियिन सेल्वन:  2’ चित्रपटानं जगभरात 200 कोटीं पेक्षा कमाई केली आहे. इतकी कमाई करत चित्रपटानं इतिहास रचला आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी 24 कोटींची कमाई केल्यानंतर सगळ्यांना आशा होती की आता हा चित्रपट चांगली कमाई करणार. अनेकांना आशा होत्या की 'पठाण'चा रेकॉर्ड हा चित्रपट मोडू शकतो. तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'ला मागे सोडलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

‘पोन्नियिन सेल्वन:  2’ हा पोन्नियिन सेल्वन फ्रॅन्चायझीचा दुसरा भाग आहे. कल्कि कृष्णमूर्ति यांनी लिहिलेल्या एका नॉव्हेलवर आधारीत हा चित्रपट आहे. चित्रपटाला सुरुवातीचे चार दिवस प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण मंगळवार पासून चित्रपटाच्या कलेक्शनची संख्या कमी होऊ लागली होती. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. दरम्यान, असे म्हटले जाते की चित्रपटानं पहिल्या भागाच्या तुलनेत चांगली कमाई केली आहे. ऐश्वर्यानं या चित्रपटात डबल रोल केले आहेत. तिच्या भूमिकांचे नाव नंदिनी आणि मूकची आई मंदाकिनी देवी अशा आहेत. 

हेही वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला करायचं होतं Sachin Tendulkar ला प्रपोज!

‘पोन्नियिन सेल्वन:  1’ नं संपूर्ण जगात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. आता सगळ्याचं लक्ष याकडे आहे की ‘पोन्नियिन सेल्वन 2’ त्याच्या पहिल्या पेक्षा जास्त कमाई केली आहे. चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्थी, तृषा, जयम रवि, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धूलिपालासोबत सरधकुमार, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिबन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नासर हे कलाकार आहेत.