'काजळ नयनी...' म्हणतं महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांनी धरला बाल्या डान्सवर ठेका, पाहा VIDEO

सध्या सगळ्यांना गणपतीच्या आगमनाचे वेध लागायला सुरुवात झाली. अशावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टिमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 6, 2024, 11:43 AM IST
'काजळ नयनी...' म्हणतं महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांनी धरला बाल्या डान्सवर ठेका, पाहा VIDEO   title=

Maharashtrachi Hasyajatra Nikhil Bane Viral Video: श्रावण महिना आज सुरु झाला आहे. आता वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. निसर्गासह चाकरमान्यांचे मन बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज होत असतात. कोकणात गणेशोत्सव हा सण अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. 

चाकरमानी अगदी श्रावणापासून गणरायाची तयारी करायला घेतात. मूर्तीकारांना मूर्ती सांगण्यापासून ते यंदा गणेशाची सजावट कशी करायची? या सगळ्याची लगबग सुरु होते. असं असताना कोकणातील गणेशोत्सवातील आणखी एक आकर्षण म्हणजे तेथील नृत्य. बाल्या डान्स नृत्य ही कोकणातील ओळख आणि हीच ओळख 'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' च्या टिमने आपल्या एका व्हिडीओतून समोर आलं आहे. 

महाराष्ट्रातील हास्यजत्रेच्या टिममधील कलाकार निखिल बने हा कोकणातील चिपळूण इथला. याने आपल्या चिपळूण गावातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आधी शेअर केले आहेत. असं असताना आता त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील सगळ्या कलाकारांना घेऊन बाल्या डान्स नृत्य केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

'काजळ नयनी कुंकू कपाळी' या गाण्यावर निखिल बने आणि त्यांच्यासोबतच्या कलाकारांनी अगदी कोकणी पद्धतीचा नृत्यू केला आहे. कोकणाला बाल्या नृत्याच्या परंपरेचा इतिहास लाभला आहे. कोकणातील पारंपरिक लोकनृत्य अशी याची ओळख आहे. 

गणपती बाप्पाचं घरा घरात आगमन झाल्या नंतर आता अनेक गावांमध्ये गावकरी एकत्र येऊन  बाल्या डान्स सादर करत असल्याचं पाहिला मिळत आहे. याच बाल्या डान्सची परंपरा कोकणातील अनेक गावांनी जपली आहे. चिपळूणमध्ये ही संस्कृती आजही जपली आहे. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन पिढीला याठिकाणी बाल्या डान्स शिकवला जातो. हीच कला निखिन बनेने इतर कलाकारांना शिकवलं आहे. 

अभिनेत्री वनिता खरात हिचा वाढदिवस हास्यजत्रेच्या टिमने अलिबाग येथे साजरा केला. याच ठिकाणी हास्यजत्रेच्या टिमने मज्जा मस्ती करत हा व्हिडीओ तयार केला आहे. आपल्या सगळ्यांना माहितच आहे निखिल बने हा मुंबईत भांडूप परिसरात राहतो. कोकणातील चिपळूण येथे त्याचं गावं आहे. या आधी पण निखिल बनेने आपल्या गावातील पूजेचा व्हिडीओ शेअर केला होता.