रणबीरसोबत व्हायरल झालेल्या 'त्या' वादग्रस्त फोटोंबद्दल माहिराने सोडले मौन...

किंग खान शाहरुखच्या  'रईस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खान आणि अभिनेता रणबीर कपूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 9, 2017, 01:48 PM IST
रणबीरसोबत व्हायरल झालेल्या 'त्या' वादग्रस्त फोटोंबद्दल माहिराने सोडले मौन... title=

नवी दिल्ली : किंग खान शाहरुखच्या  'रईस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खान आणि अभिनेता रणबीर कपूर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात माहिरा रणबीरसोबत सिगरेट ओढताना दिसत आहे. त्याचबरोबर तिने त्यात बॅकलेस शॉर्ट ड्रेस घातला होता. त्यामुळे त्यांचे हे फोटोज वादग्रस्त ठरले. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आहे. मात्र या प्रकरणात माहिराने मौन धारण केले होते. मात्र, आता तिने आपले मौन सोडले आहे. यासंदर्भात माहिरा म्हणाली की, मी आतापर्यंत गप्प होते कारण याबद्दल काय बोलावे हे मला कळत नव्हते. 

सध्या माहिरा आपल्या आगामी चित्रपट 'वरना' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरमान्य झालेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली की, माझ्या चुकांबद्दल मला पश्चाताप होत आहे. मी एक खंबीर स्त्री असले तरी या प्रकरणानंतर पूर्णपणे कोसळून गेले. मी रोज याबद्दल पोस्ट करण्याचा विचार करत होते. मात्र मग स्वतःला अडवत होते. कारण काय बोलावे हेच मला कळत नव्हते,"

पुढे ती म्हणाली, "खरं सांगायचं तर मला नाही माहित की इतक्या सगळ्या टीका कोठून आल्या. या सगळ्या टीका द्वेषातून तर नाही ना आल्या ? यामध्ये मी ट्रोलर्सना दोष देत नाही तर त्यांच्याबद्दल बोलत आहे. ज्यांना खरंच हे फोटोज पाहून वाईट वाटले. त्यांचे नाराज होणे स्वाभाविक आहे. कारण माझे ते फोटोज बघितल्यानंतर माझी आई आणि आजी दोघीही नाराज झाल्या होत्या. आता मी कोणत्याही महिलेले भेटल्यानंतर तिने जर मला सांगितले की, मला तुझे ते फोटोज आवडले नाहीत तर मी त्याबद्दल लगेच माफी मागते. 

आपल्या फॅन्सला उद्देशून माहिरा म्हणाली की, "मी एक रोल मॉडेल असेन पण परफेक्ट रोल मॉडेल नाही आहे. मी देखील माणूस आहे आणि माझ्याकडून देखील चुका होतात. त्याचबरोबर माझ्या बाजूने बोलणाऱ्या लोकांना पाहून मला खरंच आनंद झाला."