Major Missing म्हणतं आलिया रणबीरसाठी भावूक : Photo

रणवीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे होम क्वारंटाईन 

Updated: Mar 12, 2021, 01:18 PM IST
Major Missing म्हणतं आलिया रणबीरसाठी भावूक : Photo

मुंबई : आलिया भट (Alia Bhatt)  सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करत असते. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल ती खूप कमी पोस्ट करत असते. आज आलियाने आपल्या मनातील एक भावना सोशल मीडियावर शेअर केली आहे. आणि अर्थातच ही भावना तिचा बॉयफ्रेंड रणबीर (Alia Bhatt Major Missing Ranbir Kapoor) कपूर बद्दलची आहे. 

आपल्या सगळ्यांना माहितच आहे आलिया आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. रणबीर कपूरची नुकतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे रणबीर क्वारंटाईन आहे. या काळात हे दोघं एकमेकांना भेटतही नाहीत. त्यामुळे आलिया रणबीरला खूप मिस करत आहे. (आलिया भट्ट खऱ्या अर्थाने रणबीर कपूरची सपोर्ट सिस्टम) 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. ज्यामध्ये आलिया-रणबीरने एकमेकांचे हात हातात घेतले आहेत. आलियाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता ती रणबीरला अतिशय मिस करत आहे. यामुळे तिने Major Missing म्हणतं हार्टचे इमोजी टाकत हा खास फोटो पोस्ट केला आहे.  

आलिया भट, रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी सिनेमानिमित्त एकत्र भेटले होते. संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे हे दोघंही होम क्वारंटाईन आहेत. मात्र आलियाची चाचणी मात्र निगेटिव्ह आलेली आहे. असं असलं तरीही चाहत्यांनी आलियाच्या तब्बेतीची चौकशी सोशल मीडियावर केली आहे. (रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह...3 दिवसांपूर्वीच आलियासोबत होता शूटला) 

 

रणबीर कपूर आपल्या चित्रपटांच्या शूटनिमित्त सतत बाहेर असतो. नुकतंच ब्रह्मास्त्र (Brahmastra) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे रणबीरचे फोटो आलियाने (Alia Bhatt) सोशल मीडियावर शेअर केले होते. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधलं सगळ्यात हॉट कपल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. याशिवाय शमशेरा या सिनेमासाठीही रणबीरचं काम सुरू आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि वाणी कपूर असणार आहेत.