Makeup Trailer : रिंकू राजगुरूचा चतुरस्त्र अभिनय

रिंकू राजगुरू पुन्हा लीड रोलमध्ये 

Updated: Jan 4, 2020, 09:00 AM IST
Makeup Trailer : रिंकू राजगुरूचा चतुरस्त्र अभिनय  title=

मुंबई : दिग्दर्शक गणेश पंडीत यांचा मेकअप हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून 2016 साली 'सैराट' सिनेमातून लोकप्रिय ठरलेली रिंकु राजगुरू भेटीला येत आहे. रिंकु राजगुरू या सिनेमात दोन अवतारात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. 

रिंकु राजगुरू सिनेमात पूर्वी हे पात्र साकारत आहे. पूर्वी आपल्याच घरी दोन रुपात वावरताना दिसत आहे. एकदा पू्र्वी अतिशय संस्कारी मुलीप्रमाणे आपल्या घरी वागते तर तिथेच दुसरीकडे ती अतिशय चुलबूली अशी दिसत आहे. तिच्या पेहरावावरूनच तिचे हे दोन लूक समोर येतात. 

या सिनेमात रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर स्क्रीन शेअर करणार आहे. चिन्मय सिनेमात रिंकूचं स्थळ ती अतिशय संस्कारी असल्यामुळे नाकारतो. पण नंतर तिच्या बिन्धास्त आणि बोल्डड लूकमुळे ती त्याचं लक्ष वेधण्यास खरी उतरते. 

 मेकअपभोवती हा सिनेमा फिरताना दिसणार असल्याचं ट्रेलरमध्ये कळतंय. रिंकूचा नटखट अंदाज सिनेमात पाहायाला मिळणार असून त्याला इमोशनल टच असल्याचं कळतं. ट्रेलरवरून याचा थोडक्यात अंदाज लावला जात आहे. रिंकूच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षात ही खसा पर्वणी आहे. 7 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

'सैराट'नंतर रिंकूचा हा तिसरा सिनेमा आहे. कागर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. महत्वाचं म्हणजे रिंकूने अगदी करिअरच्या सुरूवातीपासूनच एक रेकॉर्ड रचला आहे. तिन्ही सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली आहे.