'गरोदरपणात शारिरीक संबध ठेवल्यामुळे...' अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे चाहते भडकले; म्हणाले...

लग्नाच्या 10 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई होणार आहे. ज्याची गोड बातमी तिने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. 

Updated: Dec 11, 2022, 10:58 PM IST
'गरोदरपणात शारिरीक संबध ठेवल्यामुळे...' अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे चाहते भडकले; म्हणाले... title=

मुंबई : सध्या मनोरंजन विश्वातून एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या येत आहेत. यापूर्वी, अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी लग्न केलं आणि अनेकांनी प्रेग्नेंसीच्या बातमीने चाहत्यांना आनंद दिला. बॉलीवूडमध्ये आलिया रणबीर (Alia Bhatt & Ranbir Kapoor) आणि करण बिपाशा (Karan Bipasha) यांनी आपल्या कुटुंबात मुलीचे स्वागत केलं, तर टीव्हीचे लोकप्रिय जोडपे देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) नुकतेच दुसऱ्यांदा आई-वडील झाले असून आता टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दानेही (Neha Marda) तिच्या प्रेग्नेंसीची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. या आनंदाच्या बातमी पाठोपाठ अभिनेत्रीने असं वक्तव्य केलं आहे की ते ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.

नेहा मर्दाने गर्भधारणेच्या सामान्य समज आणि तथ्यांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये 5 महत्त्वाच्या समजांचा समावेश आहे... जसं की गरोदरपणात चहा/कॉफी पिऊ नये. गरोदर स्त्रीने दोन लोकांसाठी (माता-मुलाचे) अन्न खावे. गरोदरपणात प्रवास करू नये...गर्भवती महिलेने व्यायाम करू नये. सकाळी मळमळ, अस्वस्थता किंवा उलट्या होणं सामान्य आहे. गरोदरपणात सेक्स केल्याने बाळाला हानी पोहोचते.

नेहा मर्दाने या सर्व समजांना उत्तरं दिली आहेत. नेहाने कॅप्शन लिहून या सर्व गोष्टी खोट्या आणि चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीनुसार, कोणतीही गर्भवती महिला चहा किंवा कॉफी पिऊ शकते. अति खाऊ नये. यामुळे तुमचं वजन वाढेल आणि मुलाला गॅसचा त्रास होईल. या टप्प्यात गर्भवती महिला आरामात प्रवास करू शकते. गर्भवती महिलेने व्यायाम करणे थांबवू नये. सकाळी उठल्याबरोबर अस्वस्थता येणे सामान्य नाही, मळमळ कधीही होऊ शकते.

तिच्या या पोस्टनंतर तिला ट्रोल केलं जात आहे. लोकांनी नेहाला तिच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितला आहे. यासोबतच लोकांनी तिला इशारा दिला आहे की, नेहा बोलण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, कारण यामुळे मुलाचं आणि आईचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तर अजून एका व्यक्तीने कमेंट करत लिहीलं की, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत सेक्स सुरक्षित नाही, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला माहिती होईपर्यंत अशा गोष्टी शेअर करू नका. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नाच्या 10 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई होणार आहे. ज्याची गोड बातमी तिने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. ही अभिनेत्री 'बालिका वधू' (Balika Vadhu) सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली असून तिने 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhla Ja) या डान्स रिअॅलिटी शोमध्येही (Dance Reality Show) भाग घेतला आहे.