मुंबई : नुकतीच खान कुटूंबाशसंबंधीत एक अशी बातमीसमोर आली आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरती अशा बातम्या व्हायरल होत आहेत की, सलमान खानला त्याच्या पुतण्याने म्हणजे अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहानने मारलं आहे. महत्वाचं म्हणजे ही गोष्ट खरी आहे. स्वत: सलमान खानने या गोष्टीबद्दल मीडियाकडे वक्तव्य केलं आहे. तसेच सलमान खानने हे संपूर्ण प्रकरण कसं आणि का घडलं? याचा देखील खुलासा केला आहे. ज्यानंतर सोशल मीडियावरती ही चर्चा आणखी तापली. परंतु आपण सगळे विचार करतोय तितकं मोठं काहीच घडलं नाही. ही गोष्ट फार पूर्वीची आहे. ज्याबद्दल सलमान खानला एका मुलाखतीदरम्यान गंमतीनं वक्तव्य केलं.
नुकताच सलमान खानचा 'अँटीम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खानने मजेशीर गोष्टी केल्या. या चित्रपटात त्याचा मेहुणा आयुष शर्मा देखील आहे. जेव्हा त्याच्याशी या चित्रपटातील फाईट सीनबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने 2010 मध्ये घडलेली एक जुनी घटना देखील सांगितली. 2010मध्ये त्याचा दबंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याने त्याचा भाऊ अरबाज खानला सोबत फाईट सिन केलं होतं. परंतु त्यानंतर मात्र सलमान खानला खराखुरा मार खावा लागला.
दबंगमध्ये सलमान खानचे चुलबुल पांडे हे पात्र खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटात अरबाज खान सलमानच्या सावत्र भावाच्या मक्कीच्या भूमिकेत होता. दोघांमध्ये प्रेम आणि भांडणही झाले. चित्रपटात एका सिनमध्ये सलमान खान अरबाजला मारहाण करतो.
mensxp च्या रिपोर्टनुसार, सलमान खानने सांगितले की, दबंगच्या स्क्रिनिंगवेळी अरबाजचा मुलगा अरहान 8 वर्षांचा होता. स्क्रिनिंग संपल्यावर अरहान रडायला लागला आणि त्याला वाटले की सलमानने अरबाजला खरंच मारलं आहे. रडताना अरहानने सलमानला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेबाबत सांगताना सलमान म्हणाला, "ट्रायल संपताच अरहान आला आणि रडत मला मारहाण करू लागला. मी विचारलं, काय झालं बेटा? तर तो म्हणाला, तू माझ्या वडिलांना मारलेस, तू माझ्या वडिलांना मारलेस आणि त्या मला इतकं जोरात मारले की बस रे बस."
सलमान म्हणतो, त्यानंतर मी अरबाजला मिठी मारण्यासाठी बोलावले. मग अरहानला सांगितले की, हे सर्व अभिनय आहे, यानंतर मला आणि अरबाजला त्याला संपूर्ण सीन दाखवावा लागला. यानंतर त्याला समजले की, ही भांडणे नाही, फक्त अभिनय आहे.
पुढे सलमान खान म्हणाला की, हो हे खरं आहे की, या सगळ्यामुळे लहान मुलांच्या मनावरती या सगळ्याचा परिणाम होतो.