हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच या दोघांचं नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप या दोघांनी अधिकृतपणे कोणतेही स्टेटमेंट केलेली नाही. दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होत असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अली गोनी दिसत आहे. यानंतर पुन्हा एकदा नताशा आणि त्याचा एक्सबॉयफ्रेंड अली गोनी यांची देखील चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये हार्दिक पांड्या आणि त्याची संपत्ती, त्याबद्दल त्याचे असलेले मत. हार्दिक पांड्याने आईच्या नावावर संपत्ती केली आहे. कारण पत्नीसोबत घटस्फोट झाला तर तिला 50 टक्के संपत्ती कोण देणार? असा प्रश्न हार्दिक पांड्याने विचारला होता.
हार्दिक पांड्याचा जुना व्हिडीओ
How smart is hardik pandya? Blud had his money already transferred in mother's account so after divorce with Natasa Stankovic, he won't lose much pic.twitter.com/PMmxgvbODh
— U M A R (@Agrumpycomedian) May 25, 2024
यानंतर आता हार्दिक पांड्या आणि अली गोल यांच्या नेटवर्थची चर्चा करत आहे. महत्त्वाचं म्हणजे अली गोनी हा संपत्तीच्या बाबतीत हार्दिक पांड्याच्या जवळपासही नसल्याचे म्हटले जाते. जम्मू काश्मीरमध्ये राहिलेल्या अली गोनीने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली आहे. टीव्ही क्षेत्रात त्याने स्प्लिटविला सिझन 5 मध्ये डेब्यू केलं. तसेच तो बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून होता. या दरम्यान त्याची जॅस्मिन भसीनसोबत रिलेशनशिप असल्याची जोरदार चर्चा रंगली.
अली गोनीच्या नेट वर्थ बद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे जवळपास 17 कोटींची संपत्ती आहे. अली दर महिन्याला 15 लाख रुपये कमावतो. अली गोनीला प्रवास भरपूर आवडतो. अली गोनीची एकूण संपत्ती 17 कोटी रुपये आहे. तो दरमहा सुमारे 15,00,000 रुपये कमावतो. तसेच, तो त्याच्या प्रत्येक एपिसोडसाठी 40000 आकारतो.
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असलेला हार्दिक पांड्याची संपत्ती जवळपास 91 कोटी रुपये आहे. तसेच हार्दिक जाहिरातींमधूनही करोडो रुपये कमावतो. त्यामुळे अली गोनी हार्दिक पांड्याच्या संपत्तीच्या जवळपासही नसल्याची चर्चा रंगली आहे.
स्पोर्ट्स वर्मनुसार, हार्दिक पांड्या एका जाहिरातीसाठी एक कोटी रुपये घेतो. केवळ ब्रँड एंडोर्समेंटमधून तो सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो. हार्दिक पांड्याच्या आर्थिक पोर्टफोलिओमध्ये हालाप्ले, गल्फ ऑयल, स्टार स्पोर्ट्स, जिलेट, जुगल, सिन डेनिम, डी:एफवाई, बॉट, ओप्पो, ड्रीम 11 सारख्या ब्रँडच्या जाहिरातींचा समावेश आहे. हार्दिक पांड्याचे वडोदरा येथे 3.6 कोटी रुपयांचे आलिशान पेंटहाऊस आणि वांद्रे येथे 30 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट आहे, जे त्याची आलिशान जीवनशैली दर्शवते.