टर्कीच्या रेस्टॉरंटमध्ये Malaika Arora चा बेली डान्स, बॅकलेस ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाल

मलायका अरोरा सध्या टर्कीमध्ये असून सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. 

Updated: Jun 9, 2022, 05:28 PM IST
टर्कीच्या रेस्टॉरंटमध्ये Malaika Arora चा बेली डान्स, बॅकलेस ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाल title=

मुंबई: मलायका अरोरा सध्या टर्कीमध्ये असून सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. मलायका टर्कीमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच एक व्हिडीओ मलायका अरोरा हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा रेस्टॉरंटमध्ये बेली डान्स करताना तर कधी टर्कीच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. मलायका अरोरा या व्हिडीओमध्ये खूप आनंदी दिसत आहे आणि ती टर्कीच्या प्रत्येक सुंदर लोकेशनचा आनंद घेत आहे.

इन्स्टाग्राममध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मलायका बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे आणि ती एका रेस्टॉरंटमध्ये बेली डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. मलायका तिच्या सुट्ट्यांचा खूप आनंद घेत असल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट झाले आहे. टर्कीला मलायकाचा बिनधास्त अंदाज दिसत आहे. या व्हिडीओ पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत. चाहत्यांनी लाईक्ससह कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दुसरीकडे, अर्जुन कपूर तिच्या आठवणीने व्यथित झाल्याचं दिसत आहे. नुकतेच अर्जुन कपूरने मोमोज खाताना एक फोटो शेअर केला, ज्यावर लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, मलायकाकडून चटणी बनवून घे आणि खा. या कमेंट्सवर अर्जुन कपूरने उत्तर देत लिहिले आहे की, "कृपया घरी आल्यावर तिला माझ्यासाठी चटणी बनवायला सांगा, सध्या ती तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे आणि फोटो शेअर करण्यात व्यस्त आहे." यावरून उत्तरावरून अर्जुन मलायकाला खूप मिस करत असल्याचं दिसत आहे.