अर्जुनची मलायकासाठी रोमांटिक पोस्ट, म्हणाला ' प्रार्थना करतो यंदाच्या वर्षी...'

अर्जुनला मलायकासाठी करायची ही मोठी गोष्ट, वाढदिवसाच्या मुहूर्तावर केलं रिवील

Updated: Oct 23, 2021, 02:56 PM IST
अर्जुनची मलायकासाठी रोमांटिक पोस्ट, म्हणाला ' प्रार्थना करतो यंदाच्या वर्षी...'

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. अनेकदा दोघं सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने फिरताना दिसतात. या दोघांची चर्चा वेगवेगळ्या कारणाने होताना दिसते. एवढंच नाही तर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दोघं त्यांच्या नात्याला वेळ देतात. आज तर मलायकाचा वाढदिवस आहे. मलायकाच्या आयुष्यातील हा खास दिवस  मग अर्जुन कसा विसरू शकतो. अर्जुनने मलायकाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत एक रोमांटिक फोटो शेअर केला आहे. 

अर्जुनने मलायकासोबत एक फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'आजच्या दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी फक्त तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणू इच्छितो... प्रार्थना करतो यंदाच्या वर्षी तू आणखी आनंदी राहशील...' सध्या अर्जुनची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्याच्या घडीला चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे. 43 वर्षीय मलायका तिच्याहून वयाने जवळपास 9 वर्षे लहान असणाऱ्या अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या या नात्याविषयी माहिती मिळताच चाहत्यांना धक्का बसला होता.