लेकीसमान Alia Bhatt लाही Karan Johar विसरला? एका प्रश्नामुळे भलताच अडकला

Malaika Arora नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Dec 14, 2022, 01:38 PM IST
लेकीसमान Alia Bhatt लाही Karan Johar विसरला? एका प्रश्नामुळे भलताच अडकला  title=

Rapid Fire Round With Karan Johar Over Kareena and Alia : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar)  हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. करण जोहरचा 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा शो तर प्रत्येकाच्या लक्षात असलेला शो आहे. या शोमध्ये करण सेलिब्रिटींसोबत रॅपिड फायर खेळत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, आता करण कोणासोबत रॅपिड फायर खेळत नसून आता मलायका अरोरासोबत (Malaika Arora) रॅपिड फायर खेळत आहे. 

मलायकाच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' शो (Moving In With Malaika)  या शोमध्ये करणनं हजेरी लावली होती. यावेळी शोमध्ये मलायका करणसोबत रॅपिड फायर खेळताना दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी मलायका करणला विचारते की तिची कोणती गोष्ट त्याला आवडत नाही? यावर उत्तर देत करण म्हणाली की तिचा पॅप गेम हा त्याच्या पेक्षा चांगला आहे. पुढे मलायका करणला विचारते की आलिया भट्ट आणि करीना कपूर यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगते. यावेळी करणनं दिलेलं उत्तर ऐकून सगळ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल... (Kareena Kapoor or Alia Bhatt)

पाहा व्हिडीओ -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करणनं हुशारीनं उत्तर देत अलिना हे हॅशटॅग वापरले. मलायकानं करणला पुढे प्रश्न विचारला की तिला कोणत्या चित्रपटात पाहायला करणला आवडेल? यानंतर मलायका करणला विचारते की तिचं कोणतं गाणं त्याला आवडत नाही. यावर उत्तर देत 'अनारकली डिस्को चली' (Anarkali Disco Chali) हे गाणं खूप जास्त चीजी वाटतं, असे म्हटले. (Malaika Arora s Rapid Fire Round With Karan Johar Over Kareena Kapoor Khan and Alia Bhatt) 

हेही वाचा : ह्यांना काय करायचंय? लग्नानंतर 10 वर्षांनी आई होण्याबाबत Ram Charan ची पत्नी संतापत असं का म्हणाली?

या रॅपिड फायर राउंडचा शेवटचा प्रश्न विचारत मलायका बोलते की तिच्यातली कोणती गोष्ट करणला आवडते? दरम्यान, मलायका ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर मलायका तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओच्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.