गुलशन कुमार यांच्या हत्येच्या 26 वर्षानंतर मोठा खुलासा, 'या' अभिनेत्याला घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात

Gulshan Kumar यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात मुंबईत नुकताच आलेल्या अभिनेता मानव कौलला  पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याविषयी मानवनं तब्बल 26 वर्षांनी खुलासा केला आहे. त्याच्या या खुलास्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2023, 05:40 PM IST
गुलशन कुमार यांच्या हत्येच्या 26 वर्षानंतर मोठा खुलासा, 'या' अभिनेत्याला घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात title=
(Photo Credit : Social Media)

Manav Kaul : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मानव कौलनं त्याच्या करिअरची सुरुवात ही नाटकांपासून केली होती. त्यानंतर मानव कौलनं भूषण कुमार आणि टी-सीरीज साठी ‘तुम्हारी सुलू’, ‘जॉली एलएलबी 2' आणि 'मॅडम चीफ मिनिस्टर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण तुम्हाला ऐकूण धक्का बसेल की एकेकाळी टी सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येच्या प्रकरणात मानव कौलला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मानव कौलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. यावेळी मानव कौलनं त्याच्या मुंबईतील सुरुवातीचा काळाबद्दल खुलासा केला आहे. 

मुंबईतील सुरुवातीचे दिवस आठवत मानव कौल सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी काही मुलांबरोबर दहिसरमध्ये एका खोलीत राहायचो. तेव्हा पैशाची चणचण होती. आम्ही सगळी मुलं नाश्त्याचे पैसे वाचवण्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत जागरण करायचा ,त्यानंतर चहा पिऊन झोपायला जायचा जेणेकरून दुसऱ्या दिवशी नाश्ता न करता थेट दुपारच्या जेवणाला जाऊ शकेल. दिवसभर कामासाठी फिल्मसिटीत फिरायचा आणि परत यायचं असं त्याचं आणि त्याच्या 5 मित्रांचं रुटिन होतं. त्यामुळे हे पाच जण रात्री उशिरा येतात, रात्री पत्ते खेळून दुसऱ्या दिवशी तयारी करून निघून जातात, असा संशय त्याच्या सोसायटीतील लोकांना आला. त्यामुळे सोसायटीतील लोकांनी त्याच्याबद्दल तक्रार केली."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी सांगताना मानव कौल म्हणाला, याच काळात एक दिवस गुलशन कुमार यांच्यावर मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी चालू असताना एक दिवस रात्री पोलिस त्यांच्या खोलीत आले आणि त्यांनी थेट विचारले की गुलशन कुमारला कोणी मारले? त्यावेळी आम्ही सर्व खोलीत पत्ते खेळत होतो. पोलिसांचा विचित्र प्रश्न ऐकून सर्वाना धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना दहिसर पोलीस ठाण्यात नेल्याने त्यातील 2-3 जण घाबरले. एका अधिकाऱ्यानं मला विचारलं, 'तुझा कट्टा कुठे आहे? तू काश्मिरी आहेस?' मी एक नाटकात काम करणारा कलाकार आहे हे मी त्यांना समजावत होतो. त्यांनी आमची चौकशी केली आणि शेवटी आम्हाला सोडून दिलं.”  त्यावेळी मानवच्या मनात विचार आला होता की मुंबईने आपले असे स्वागत केले आहे. 

हेही वाचा : "चीनमध्ये तळलेले किडे खाल्ले अन्...", अभिनेत्री Mrinal Kulkarni यांनी सांगितला 'तो' अनुभव

या प्रकरणाचा अनेक वर्षांनंतर जेव्हा मानवने T-Series च्या 'तुम्हारी सुलू'  या चित्रपटात काम केले तेव्हा त्याने T-Series च्या ऑफिसला भेट दिली, ऑफिस मध्ये जेव्हा त्याने गुलशन कुमारचा फोटो पाहिला आणि त्याला आश्चर्य वाटले की या सर्वांची सुरुवात कुठे झाली आणि तो आता किती पुढे आलाय.