मुलीला स्तनपान करत मॉडेल मारा मार्टिनचा रॅम्पवॉक

 मॉडेल मारा मार्टिन स्पोर्टस इलस्ट्रेटेड स्विमसूट परिधान करत रॅम्पवरवर अवतरली.

Updated: Jul 18, 2018, 08:25 AM IST
मुलीला स्तनपान करत मॉडेल मारा मार्टिनचा रॅम्पवॉक

मुंबई : मॉडेल मारा मार्टिन स्पोर्टस इलस्ट्रेटेड स्विमसूट परिधान करत रॅम्पवरवर अवतरली. इतकंच नाही तर तिचा हा रॅम्पवर काहीसा वेगळा आणि लक्षवेधी ठरला. कारण माराने आपल्या मुलीला स्तनपान करत रॅम्पवर केला. माराची मुलगी आरिया ही फक्त पाच महिन्यांची आहे. आपल्या चिमुरडीला स्तनपान करत तिने रॅम्पवॉक केला. हे सगळं पाहून सर्वांच्या नजरा मारावर खिळल्या आणि अचंबित होऊन सारे पाहतच राहिले. 

आतापर्यंतचा हा सर्वात हटके रॅम्पवॉक होता. माराच्या रॅम्पवॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारा अतिशय आनंदी आणि उत्साही दिसत आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या देहबोलीतून झळकत आहे. तसंच माराला चिअर करण्यासाठी उपस्थित प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत.

 

GIRL POWER!  #SISwimSearch Sweet 16 finalist Mara walks the runway while breastfeeding her five-month-old baby. @paraisofashionfair

A post shared by Sports Illustrated Swimsuit (@si_swimsuit) on

मारा मार्टिन ही मिशिगनची राहणारी आहे. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझिनने मियामी स्वीम वीकसाठी निवडलेल्या १६ फायनलिस्टपैकी मारा एक आहे.