"25 पाहुणे, फक्त मंगळसुत्राची खरेदी अन्...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं घरातच लावलं लग्न

Neha Joshi : नेहा जोशी ही लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री आहे. नेहानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले त्यापैकी एक म्हणजे तिनं फक्त 25 पाहुण्यांच्या उपस्थितीत घरीच लग्न केलं आणि त्याशिवाय फक्त मंगळसुत्राची खरेदी केली अशा अनेक गोष्टींचा खुलासा तिनं केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 31, 2023, 04:24 PM IST
"25 पाहुणे, फक्त मंगळसुत्राची खरेदी अन्...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं घरातच लावलं लग्न title=
(Photo Credit : Neha Joshi Instagram)

Neha Joshi : मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. नेहानं फक्त नाटक आणि मालिका नाही तर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नेहा जोशीनं आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा तिच्या कामासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नेहानं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात गुपचूप लग्न करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला हे म्हणायला हरकत नाही.  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नेहानं तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. 

नेहानं नुकतीच 'नवभारत टाइम्स'ला मुलाखत दिली होती. यावेळी नेहानं तिच्या लग्नाविषयी आणि पतीविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नेहा म्हणाली की गेल्या वर्षी 16 ऑगस्टला अभिनेता ओमकार कुलकर्णीबरोबर मी सप्तपदी घेतल्या. त्यानंतर 21 ऑगस्टला आम्ही दोघांनी लगेच कामाला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही फक्त 4 ते 5 वेळा आमची भेट झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे नेहा जोशी म्हणाली, “मी स्वतःची तुलना ओमकारबरोबर करत नाही. कारण तो मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतो. मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवते. मी लग्नही अगदी साध्या पद्धतीने केलं. माझ्या लग्नात फक्त 20 ते 25 लोकांच्या उपस्थित घरामध्येच लग्न झालं. कमी लोकांमध्ये लग्न झालं पाहिजे हिच माझी अट होती. मंगळसुत्र व्यतिरिक्त मी इतर कोणतेही दागिने लग्नासाठी खरेदी केले नाही”.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे लग्नात दागिने खरेदी न करण्यावर नेहा म्हणाली, "माझ्या लग्नात मी फक्त मंगळसुत्र खरेदी केलं होतं. त्यामुळे जे लोक लग्नात दागिने खरेदी करतात त्यांना मी दोष देत नाही, पण जे लग्नासाठी दागिने खरेदी करत नाहीत त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. खरंतर लग्न एका उस्तवाचं निमित्त असतं. तर पूर्वीच्या काळी सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी संधी फार कमी मिळायची पण अलिकडेच प्रत्येक गोष्ट ही सेलिब्रेट करतात."

हेही वाचा : VIDEO : "मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचंय" म्हणत राज ठाकरेंनी फोन जोडला आणि....

पुढे तिच्या कामाविषयी सांगताना नेहा म्हणाली "मी कोणत्याही मालिकेला हो बोलण्याआधी त्याची पटकथा बघते. मग शोमध्ये मला व्हॅनिटी व्हॅन मिळणारी की नाही किंवा मग रस्त्यावर खुर्चीत बसायला सांगितलं तरी सुद्धा. जर चांगली पटकथा नसेल आणि व्हॅनिटी व्हॅन असेल तर मला कसं तरी वाटू लागतं. चांगली पटकथा असणे गरजेचे आहे, ज्यानं समाजावर चांगला परिणाम होईल, काही चांगले बदल होतील. मग त्यासाठी कमी पैसे मिळाले तरी काही हरकत नाही."