'हा' मराठमोळा कोरिओग्राफर देतोय नोरा फतेहीला डान्सचे धडे

नोरा बॉलिवूडमधील टॉप आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते.  

Updated: Feb 12, 2021, 04:55 PM IST
'हा' मराठमोळा कोरिओग्राफर देतोय नोरा फतेहीला डान्सचे धडे title=

मुंबई : नोरा फतेही तिच्या डान्सनं आणि हटके अंदाजामुळे कायमच चाहत्यांना घायाळ करते. सध्या सोशल मीडीयावर या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तीनं छोड देंगे' या गाण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. तिची मेहनत या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मुख्य म्हणजे ज्या गाण्यात नोराने मेहनत घेतली आहे ते गाणं मरोठमोळा कोरिओग्राफर आशिष पाटीलनं कोरिओग्राफ केलं आहे. आशिष पाटील हा मराठी सिनेसृष्टीतला नामवंत कोरिओग्राफर आहे..

नोराचं 'छोड देंगे' नुकताच रिलीज झाला आहे, जे चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. नोराने आता या गाण्याच्या तयारीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या डान्ससाठी खूप उत्साही दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा यापूर्वी कधीही असा नृत्य केला नाही. यावेळी नोरानेही एक्सप्रेशन्सच्या मागे खूप मेहनत घेतली आहे. नोराने तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे, ज्यात तिची स्टाईल पाहून लोक वेडे झाले आहेत. अलीकडेच नोराने तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला. नोरा मूळची मोरोक्को, कॅनडाची आहे.

नोराने २०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'गर्जनाः या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. त्यानंतर ती 'बाहुबली: द बिगनिंग' यासह काही हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये देखील काम केलं. यानंतर नोरा 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली. नोरा बॉलिवूडमधील टॉप आयटम गर्ल म्हणून ओळखली जाते. जी स्वत: च्या डान्सने चाहत्यांचे मनं जिंकते.