लग्नबंधनात अडकण्यास मराठमोळी अभिनेत्री सज्ज....

लग्नापूर्वीच्या विधींना उत्साहात सुरुवात... 

Updated: Dec 31, 2019, 02:23 PM IST
लग्नबंधनात अडकण्यास मराठमोळी अभिनेत्री सज्ज....
संग्रहित छायाचित्र

मुंबई : वर्षभरात सेलिब्रिटी विश्वात लग्नसराईचे वारे चांगल्याच वेगाने वाहत असल्याचं पाहायला मिळालं. अगदी यंदाच्या वर्षी अखेरच्या दिवसापर्यंत हे वातावरण असंच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी निमित्त ठरत आहे ती म्हणजे एका मराठमोळ्या अभिनेत्रीकडे सुरु असणारी लग्नसराई. टेलिव्हिजन विश्वात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील काही कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री आहे नेहा पेंडसे. 

सध्या सोशल मीडियावर नेहाची बरीच चर्चा सुरु आहे. या चर्चेमागचं कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वीच नेहा लग्नबंधनात असल्याचं उघड झालं होतं. त्यामागोमागच आता तिच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये नुकतीच ग्रहमुख पूजा झाल्याचं लक्षात येत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये नेहा लग्नाआधीच्या या विधींमध्ये अतिशय आनंदात सहभागी होताना दिसत आहे. ज्यामध्ये तिने लाल रंगाची किनार असणारी सुरेख साडी नेसली आहे. तर, नववधूच्या रुपाला आणखी उठावदार करत आहेत, त्या म्हणजे मोत्याच्या साजेशा मुंडावळ्या. 

 
 
 
 

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहा तिचा प्रियकर शार्दुल सिंग याच्यासह लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने या नात्याची अधिकृत माहिती दिली होती. शार्दुलचा कलाविश्वाशी थेट संबंध नाही. तो एक व्यावसायिक असल्याचं खुद्द नेहानेत सांगितलं होतं. इन्स्टाग्रामवरुन तिने त्याच्यासोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले होते. 

 
 
 
 

#Nehhapendse is getting engaged to #shardulsingh bayas and she is entering a new phase of life. This is a big news and we can't wait to know more of her . We got to see the pictures from the grahmukh pooja and she looks absolutely stunning and so happy. She is definitely going to be bride goals. We spoke to nehha over phone on her wedding and here is what she has got to say, " i am so happy to be in this phase. I am marrying the man of my dreams and entering into a new and amazing family. They are beautiful humans and i can't wait to start my life there. It's the best feeling of my life. I can't thank enough all the people in my life who made this ocassion so beautiful and worthy. " She is one strong woman we know. Be her stint with television, acting or bigg boss she has always risen to the ocassion and made it worth our while. We wish her all the luck and love for this new phase of here life . #perfectwomanteam #perfectwomanpvtltd #perfectwomanmagazine

A post shared by Perfect Woman (@perfectwomanpvtltd) on

सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार नेहा आणि शार्दुल यांचा विवाहसोहळा अगदी खासगी पद्धतीने पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती असेल. तिचा साखरपुड़ासुद्धा असाच खासगी पद्धतीने पार पडला होता. सेलिब्रिटी वर्तुळात असतानाही अतिशय खासगी पद्धतीनेच हे आनंदाचे क्षण अनुभवणाऱ्या या अभिनेत्रीचा हा अंदाज प्रेक्षकांनाही चांगलाच भावला असून, तिच्यावर सर्वांनी आतापासूनच कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.