close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

‘मर्दानी 2’ चित्रपटाचे शुटींग सुरू

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा रूपेरी पडद्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.

Updated: Mar 28, 2019, 01:35 PM IST
‘मर्दानी 2’ चित्रपटाचे शुटींग सुरू

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा रूपेरी पडद्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. यशराज फिल्मच्या माध्यमातून ‘मर्दानी 2’ या चित्रपटात महिला पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने ‘मर्दानी 2’ चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात केली आहे. बुधवारी राणीने ‘मर्दानी 2’ च्या शुटींगसाठी यश राज फिल्म्सच्या सेटवर पाय ठेवला आहे. यश राज फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट करण्यात आले आहे. ज्यामध्ये राणीने चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात केलेल्याचे म्हंटले आहे. 

 

शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये चित्रपटातील राणीचा एक लूक समोर आणला आहे. ज्यामध्ये राणीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स घातली आहे. ‘मर्दानी 2’चित्रपट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'मर्दानी' चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी केले होते. याआधी प्रदीप सरकार यांनी ‘लागा चुनरी में दाग’ आणि ‘लफंग परिंदे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. 

‘मर्दानी 2’चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरण करणार आहेत. गोपी पुथरण या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहेत. वर्षाच्या शेवटी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  2018 मध्ये राणीचा 'हिचकी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चाहत्यांचे चांगले मनोरेजन केले होते.