मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' (Maza Hoshil Na) मधील आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) कोरोनावर (Corona Free) मात केली आहे. दिवाळीची सुट्टी घेऊन पुण्यात आपल्या घरी गेलेला विराजस १० दिवस आयसोलेटमध्ये होता. विराजसने स्वतः याबाबत माहिती दिली आहे,
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत विराजसने कोरोनावर मात केली आहे. दिवाळी ह्या आजाराने खाल्ली, पण आता पुन्हा shooting साठी सज्ज झालो आहे, असं म्हणतं विराजने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.
त्या अगोदर विराजसने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. दिवाळीच्या काळात कोरोनाची लागण झाल्यामुळे भाऊबीजही साजरी करता आली नव्हती.
विराजस कुलकर्णी हा ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा नातू आणि लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजसने लेखन आणि दिग्दर्शनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. त्याने मृणाल कुलकर्णी यांच्या 'रमा-माधव' सिनेमात असिस्ट केलं आहे.
विराजसने आतापर्यंत अनेकदा लेखन केलं आहे. कोरोनाच्याकाळात विराजच्या दिग्दर्शनाखाली मृणाल कुलकर्णी यांनी त्यांचे पती रुचिर कुलकर्णी यांच्यासोबत रेड लेबल चहाची जाहिरात घरच्या घरी शूट केली आहे.