नवी दिल्ली : सुपर मॉडल, अभिनेता आणि आर्यन मॅन मिलिंद सोमण आणि याची 28 वर्ष लहान गर्लफ्रेंड सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. अंकिता कोनवार असे या मुलीचे नाव असून ती 23-24 वर्षांची आहे. ती एअरहोस्टेस आहे.
आजकाल यांचे फोटोज सोशल मीडियावर अगदी जलद व्हायरल होतात. अलिकडेच मिलिंदने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तो पुश अप्स करत आहे आणि अंकिता त्याच्या पाठीवर बसली आहे.
मिलिंद सोमण 52 वर्षांचा आहे. त्याने अंकिताच्या घरच्यांशी भेट घेतली आहे. लवकरच सर्वांच्या सहमतीने ते दोघे विवाहबद्ध होतील.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या वयातील फरकामुळे मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला काहीसे विरोध करणाऱ्या अंकिताच्या कुटुंबियांनी मिलिंदचा स्वभाव पाहुन लग्नाला परवानगी दिली आहे. मिलिंदच्या स्वभावामुळे अंकिताच्या घरची मंडळी अत्यंत खूश आहेत.
दोघांचे नाते जेव्हा लोकांसमोर आले तेव्हा त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. कारण म्हणजे दोघांच्या वयातील अंतर. त्याचबरोबर हे मिलिंदचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री मिलिन जॅम्पेनोईशी 2006 मध्ये लग्न केले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 3 वर्षातच ते दोघे विभक्त झाले.