शाहिदचा १६ वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल

मीरा कपूरने शेअर केला शाहिदचा फोटो

Updated: Jun 14, 2019, 05:34 PM IST
शाहिदचा १६ वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. शाहिद आणि मीरा २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकले. आता हे दोघे दोन मुलांचे आई-वडील आहेत. शाहिद-मीरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमातून एकत्र पाहायला मिळतात. नुकताच मीराने शाहिदचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

मीराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शाहिदच्या फोटोचं कोलाज शेअर केलं आहे. फोटोला '१६ ईयर चॅलेंज' असं कॅप्शनही दिलं आहे. या कोलाजमध्ये शाहिदच्या 'इश्क-विश्क' चित्रपटातील एक फोटो आणि आगामी 'कबीर सिंह' चित्रपटातील एक फोटो असं कोलाज केलं आहे. या दोन्ही फोटोमधून शाहिदचे दोन वेग-वेगळे लूक पाहायला मिळत आहेत. गेल्या १६ वर्षांत शाहिदमध्ये झालेला फरकही फोटोमधून दिसतो आहे. या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंटही येत आहेत.

 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

सध्या शाहिद कपूर त्याच्या आगामी 'कबीर सिंह' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. या चित्रपटातून त्याच्यासह अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे. २०१७ मध्ये आलेला तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा 'कबीर सिंह' हिंदी रिमेक आहे. संदीप वंगा दिग्दर्शित 'कबीर सिंह' येत्या २१ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.