कोण आहे 'ही'... जिच्याकडे थांबून थांबून पाहताहेत लोक

ती अनेकदा तिच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते.   

Updated: May 7, 2022, 02:15 PM IST
कोण आहे 'ही'... जिच्याकडे थांबून थांबून पाहताहेत लोक  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Mirzapur Actress Anangsha Biswas: गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांचं रुप पुरतं बदललं आहे. लॉकडाऊनच्या काळात जिथं चित्रपटांचे व्यवसाय वाट हरवून बसले तिथंच वेब सीरिज विश्वाला मात्र उसळी मिळाली. असंख्य सीरिज पाहत प्रेक्षकांनी मनोरंजनाचे पर्याय शोधले. याच वेब सीरिजमधलं एक नाव म्हणजे, 'मिर्झापूर' (Mirzapur). 

'मिर्झापूर'चं कथानक आणि त्यामध्ये भूमिका साकारणारे कलाकार या सर्वांनाच चाहत्यांनी कमाल पसंती दिली. या सीरिजमधला कायम लक्षात राहील असाच एक चेहरा ठरला अभिनेत्री अनंग्शा बिस्वास (Anangsha Biswas)चा. 

'ज़रीना' ची भूमिका साकारणारी अनंग्शा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते. 

अनंग्शाचे बरेच फोटो बोल्ड स्वरुपातील असतात. तिची प्रत्येक अदा फोटो पाहणाऱ्यांना घायाळ करत असते. 

इन्स्टाग्रामवर अनंग्शाचे तब्बल 171 हजार इतके फॉलोअर्स आहेत. हा आकडा पाहूनच तिच्या लोकप्रियतेचा अगदी सहज अंदाज लावता येत आहे. 

2007 मध्ये सुधीर मिश्रा यांच्या 'खोया-खोया चांद' या चित्रपटातून अनंग्शानं कलाजगतात पदार्पण केलं होतं. टप्प्याटप्प्यानं तिनं कारकिर्दीत कलाकृतींची निवड करत लोकप्रियता मिळवली. अशा या अभिनेत्रीची तुम्हाला सर्वात जास्त भावलेली अदा कोणती ?