रोहितनंतर 'या' तरुणाशी वाढतेय मानुषी छिल्लरची जवळीक

अहानने मानुषीच्या बर्थ डेला रिंग गिफ्ट केल्याचेही वृत्त आहे.

Updated: Aug 31, 2018, 12:28 PM IST
रोहितनंतर 'या' तरुणाशी वाढतेय मानुषी छिल्लरची जवळीक title=

मुंबई : मानुषी छिल्लर २०१७ सालचा विश्व सुंदरी खिताब जिंकल्यानंतर चर्चेत आली. सध्या बॉलीवुडमध्ये आपलं करियर बनवताना दिसत आहे. यासाठी तिच्या बॉलीवुड इंडस्ट्रीतील लोकांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार सध्या मानुषी चंकी पांडेचा भाचा अहानसोबत दिसत आहे. या दोघांना पार्टी आणि फिरताना एकत्र पाहीलं गेलंय. एका कॉमन मित्राच्या पार्टीत दोघांची मैत्री झाली. अहानने मानुषीच्या बर्थ डेला रिंग गिफ्ट केल्याचेही वृत्त आहे.

 

When three Miss Worlds meet 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

रोहितशी डेट 

 

“...So how could I dance with another, When I saw her standing there...”

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

हे दोघं एकमेकांना डेट करतायत अशीही चर्चा आहे. शाहरूखची मुलगी सुहानाचाही अहान चांगला मित्र आहे. सध्या अहानदेखील बॉलीवुडमध्ये डेब्युच्या तयारीत आहे. याआधी मानुषी मिस्टर वर्ल्डचा खिताब जिंकलेल्या रोहित खंडेलवालला डेट करत होती. मानुषीला मिस वर्ल्डसाठी रोहितनेच ट्रेनिंग दिली होती. दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केलं.

अहान आणि अमायरा 

 

A post shared by Ahaan Pandey (@aahan.pandey) on

अहानबद्दल बोलाल तर त्याची अभिनेत्री अमायरा दस्तूरसोबत चांगली मैत्री होती. दोघे एकत्र पार्टी, डान्स करायचे, स्नूकर खेळायचे, रात्ररात्रभर एकमेकांशी गप्पा मारायचे. पण सध्या अहान आणि मानुषीची डेटींग चर्चेचा विषय झाली आहे.