'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

नेहा चौधरी | Updated: May 11, 2024, 11:26 AM IST
'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य title=
Mithun Chakraborty big statement regarding Salman Khan marriage

Mithun chakraborty on Salman Khan Marriage : बॉलीवडू दबंग सलमान खानचा 27 डिसेंबरला (Salman Khan birthday) 59 व्या वाढदिवस (Salman Khan age) आहे. तरीदेखील तो अजून अविवाहित आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान (Salman Khan News) चर्चेत आहे. सलमानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर लॉरेन्स बिश्नोई गटाच्या लोकांनी गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सलमान खान कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. 

 'मी गॅरंटी देतो तो...' 

एक कार्यक्रमात मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty) यांनी भाईजानच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. सलमान खान आणि मिथुन चक्रवर्ती यांची मैत्री ही सर्वांनाच ठावूक आहे. अनेक कार्यक्रमात त्यांचं बॉण्डिग दिसून आलं. त्यात मिथुन चक्रवर्ती यांनी सलमानच्या लग्नाबद्दल केलेलं विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 

काय म्हणाले मिथुन चक्रवर्ती?

खरं तर सोशल मीडियावर मिथुन आणि सलमान खानचा जुना किस्सा पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. टीव्ही रिॲलिटी शो 'सा रे ग म पा' मध्ये मिथुन यांना एक प्रश्न विचारला गेला होता. यावेळी मिथुन यांनी सलमान खानच्या लग्नाबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

शोचे होस्ट आदित्य नारायण यांनी मिथुनला विचारलं की, जॅकी श्रॉफ, सलमान खान, संजय दत्त आणि अक्षय कुमार यांच्यापैकी कोणासोबत स्क्रीन शेअर करताना त्रास झाला. यावर उत्तर देताना मिथुन म्हणाले की, सलमान खान सर्वात खोडकर मुलगा आहे. पण माझं त्यावर खूप प्रेमदेखील आहे. जर सेटवर आम्ही दोघो असून तर आम्ही एक सेकंदही शांत राहू शकतं नाही. तो मला सतत शोधत असतो, मी झोपलो तर मला उठवतो. 

'...आणि हा पोरगा रात्री दोन वाजता'

2005 मधील लकी या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा त्यांनी सांगितला. ''रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये आम्ही असताना रात्रीचे 2-3 वाजेल असेल. मी खोलीत आतून दार बंद करुन झोपलो होतो. तो आत कसा आला हे मला अजूनही कळलं नाही. मी डोळे उघडले तर हा पोरगा माझ्या डोळ्यासमोर उभा होता आणि हा हा हा हसत होतो. त्यावेळी मी म्हटलं त्याला तू कसला माणूस आहेस?''

सलमान खानच्या लग्नाबद्दल काय म्हणाले मिथुन?

या शोच्या वेळी मिथुन यांनी सलमान खानच्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ''तो कधीच लग्न करणार नाही, पण सगळ्यांना फसवत राहतो. बघा मी अविवाहित आहे. असं सांगून तो मुलींना मुर्ख बनवतो. अशा माणसावर कोणाचं प्रेम नाही होणार? पण हा मुलगा लग्न नाही करणार. मी गॅरंटी देतो तो नाही करणार लग्न.''