Mithun Chakraborty: बॉलिवूडचे डिस्को डान्सर अशी ओळख असणारे मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या काळातील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाच्या आणि डान्सच्या लाखो चाहत्या होत्या. फक्त मिथुन नाही तर त्यांची पत्नी योगिता बाली देखील तितकीच फेमेस आहे. मिथुन यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीनंतर नमोशीनं देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या बॉलिवूड करिअर विषयी बोलायचे झाले तर त्यांनी काही फ्लॉप चित्रपट देखील दिले आहेत. पण तरी त्यांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. मिथुन चक्रवर्ती यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं जाणून घेऊया त्यानिमित्तानं काही खास गोष्टी...
मिथुन चक्रवर्ती यांना तीन मुलं आहेत एकाचं नाव मिमोह, नमोशी आणि उष्मेय तर त्यांना एक मुलगी असून दिशानी असे तिचे नाव आहे. तर यांच्यापैकी दोन मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहेत. तर त्यांची मुलगी दिशानी देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशा चर्चा सतत सुरु असतात. तुम्हाला माहितीये का मिथुन चक्रवर्ती यांची ही लेक दत्तक घेतलेली आहे. त्यामागची कहाणी काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मिथुन चक्रवर्ती एका बंगाली वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती ज्यात कचऱ्यात सापडलेल्या एका मुलीची बातमी वाचली होती. ही बातमी वाचल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी लगेच निर्णय घेतला की ते त्या मुलीला दत्तक घेतील. त्यानंतर मिथुन यांनी लगेच दिशाला दत्तक घेतले आणि तिला सगळ्या सुख-सुविधा असलेलं आयुष्य दिलं. दिशा आज परदेशात तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली असून ती खूप लक्झरी आयुष्य जगते आहे.
हेही वाचा : 'अनीता भाभी' ला पिंक बिकिनीत पाहून नेटकरी हैराण, म्हणाले "मिस वर्ल्डमध्ये सहभागी हो..."
मिथुन यांनी 1976 साली प्रदर्शित झालेल्या मृगया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण डिस्को डान्सर या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. कामाच्या शोधात मुंबई गाठलेल्या मिथुन यांना अनेक महिने काम न मिळाल्याने ते दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी देखील खूप मेहनत करायचे. अनेक वेळा तर ते रात्री उपाशी राहिले. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. तर मिथुन यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'दो अंजाने' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. तर मिथुन यांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या स्ट्रगलिंगच्या दिवसात त्यांना रंग आणि लूक्सवरून जज करण्यात येत होते.