नवी दिल्ली : बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है' कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. पण या सिनेमा समोरचा मार्ग सोपा दिसत नाहीए.
'मनसे' तर्फे मुंबईतील थिएटर्सना धमकीवजा पत्र देण्यात आले. जर मराठी सिनेमा 'देवा' ला जास्त स्क्रीन मिळाल्या नाहीत तर 'टायगर जिंदा है' ला देखील थिएटरमध्ये चालू देणार नाही अशी भूमिका 'मनसे'ने घेतली आहे.
'मराठी सिनेमांना प्राइम टाइम शो मिळायला हवे, 'देवा' ला 'टायगर जिंदा है', च्या तुलनेत स्क्रीन स्पेन दिला जात नाही. मराठी सिनेमांच्या खर्चावर हिंदी सिनेमा स्क्रीन स्पेस घेत असतील तर आम्ही त्याला विरोध करु.
आम्ही धमकी दिली नाही पण 'देवा' ला स्क्रीन स्पेस मिळायला हवी' असे मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी 'एएनआय' ला सांगितले.
मनसेच्या धमकीनंतर थिएटर मालक चिंतेत आहेत. 'टायगर जिंदा है' चे ए़डव्हान्स बुकींग मोठ्या किंमतीत झाली आहे. 'ए दिल है मुश्किल', 'दिलवाले', 'कुर्बान' या सिनेमांनाही मनसेने धमकी दिली होत.
मनसेने मराठी सिनेमांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धाव घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिनेमागृहांच्या मालकांना एक पत्र पाठवलं आहे.
यात त्यांनी लिहिले की, जर मराठी सिनेमाला ‘देवा’ प्राईम टाईममध्ये दाखवला गेला नाही तर ते सलमान खानचा येणारा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा कोणत्याही सिनेमागृहात लागू देणार नाही.
ठाकरे यांच्यानुसार, ‘सलमान खानच्या टायगर जिंदा है सिनेमामुळे ‘देवा’ या मराठी सिनेमाला स्क्रिन मिळत नाहीये.
अशात जर महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना स्क्रिन मिळत नसेल तर आम्ही इथे कोणताही हिंदी सिनेमा लागू देणार नाही’.
मराठी सिनेमा ‘देवा’ या महिन्यात २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. आणि याच दिवशी सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायरग जिंदा है’ सिनेमा रिलीज होणार आहे.
ठाकरेंच्या पत्रानंतर सिनेमागृहांच्या मालकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचं अनेकांनी अॅडव्हांस बुकिंगही केलं आहे त्यामुळे त्यांना तसाही फट्का बसू शकतो