मुंबई : आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. फक्त चित्रपटच नव्हे, तर दैनंदिन आयुष्यातील बऱ्याच निर्णयांमुळेही सुष्मिताने नेहमीच सर्वांची मनं जिंकली आहेत. इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या सुष्मिताच्या आयुष्यातही सध्या असच एक वळण आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच ४३ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या अभिनेत्रीसाठी तिच्या प्रियकराने म्हणजेच रॉमन शॉल याने एक सुरेख असा संदेश लिहिला आहे. सुष्मितासोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत रॉमन नेहमीच त्याचं प्रेम व्यक्त करत असतो.
आताही त्याने असाच एक पोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत त्यासोबत साजेसं कॅप्शनही लिहिलं. प्रेम म्हणजे फक्त सुखात आणि यशातच नव्हे, तर दु:खात आणि चढ- उतारांमध्ये प्रत्येक वेळी आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत जावं, हीच भावना प्रेमात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते.
रॉमननेही सुष्मिताचा असाच एक फोटो पोस्ट केला आहे, मोनोक्रोम प्रकारच्या या फोटोमध्ये काळ्या रंगाची छटा जास्त प्रमाणात दिसत आहे. त्याय अनुशंगाने कॅप्शन देत रॉमनने लिहिलं आहे, ‘I’ll follow you into the dark!!.'
अंधाऱ्या वाटेतही मी तुझ्या मागे येईन, असं म्हणत त्याने या फोटोमध्ये सुष्मितालाही टॅग केलं आहे. त्याचा प्रेम व्यक्त करण्याचा हा अंदाज पाहता येत्या काळातही हे नातं असंच आणखी खुलत राहो, अशीच इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
अभिनय विश्वात आपलं असं वेगळं स्थान प्रस्थापित करणाऱ्या सुष्मिताचा प्रियकर, रॉमन शॉल हा एक मॉडेल आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या बऱ्याच डिझाईन्ससाठी त्यानने मॉडेलिंग केलं, ज्यानंतर तो प्रकाशझोतात आला. सुष्मिता आणि तो गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असून, आता त्यांनी या नात्यावर सोशल मीडियाच्याच माध्यमातून शिक्कामोर्तबही केलं आहे.