मन्नतमध्ये पोहोचलेल्या 'त्या' मॉडेलसाठी Shah Rukh Khan नं बनवला पिझ्झा! ही खास पाहुणी पाहिली का?

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी गेल्यानंतर तिला कसा अनुभव आला याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. त्याशिवाय शाहरुखनं तिच्यासाठी खास पिझ्झा बनवल्याचे देखील तिनं सांगितले. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 24, 2023, 05:10 PM IST
मन्नतमध्ये पोहोचलेल्या 'त्या' मॉडेलसाठी Shah Rukh Khan नं बनवला पिझ्झा! ही खास पाहुणी पाहिली का?  title=
(Photo Credit : Navpreet Kaur Instagram)

Model Navpreet Kaur Visit Shahrukh Khan Home: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shah Rukh Khan) भेटणं ही सगळ्यांची इच्छा असते. त्याचे अनेक चाहते तर त्याचं घर म्हणजेच मन्नतच्या बाहेर फोटो काढतात. जेणेकरून त्यांच्याकडे शाहरुखची एक आठवण राहिल. तर ईद असो किंवा मग त्याचा वाढदिवस शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मन्नत बाहेर गर्दी असते. पण एका मॉडेलला चक्क शाहरुखला भेटण्याची संधी मिळाली. इतकंच नाही तर शाहरुखनं तिच्यासाठी त्याच्या हाथानं पिझ्झा बनवला आणि संपूर्ण खान कुटुंबानं तिला खूप चांगली वागणूक दिली. आता ही मॉडेल कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्या मॉडेलचं नाव नवप्रीत कौर (Navpreet Kaur) असं आहे. नवप्रीतनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला मन्नतमध्ये खान कुटुंबियांसोबत कसा अनुभव आला या विषयी सांगितले आहे. 

नवप्रीतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नवप्रीतनं तिला आलेला अनुभव सांगितला आहे. या पोस्टमध्ये नवप्रीतनं शाहरुखसोबत एक सेल्फी शेअर केला. त्यानंतर दुसऱ्या फोटोत पिझ्झा दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत एका टिश्यूवर नवप्रीत कौर आणि अबराम खान असं लिहिलं आहे. हे फोटो शेअर करत म्हणाली, 'मी स्वत: ला प्रॉमिस दिलं होतं की मी कधीच ही पोस्ट शेअर करणार नाही. पण ज्या आठवणी असतात त्या खूप खास असतात. ज्या मी माझ्याजवळ सांभाळून ठेवू शकते. मन्नतमध्ये घालवलेला हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास आहे. शाहरुख खाननं स्वत: पिझ्झा बनवला होता आणि तो पण व्हेज. कारण काही पंजाबी हे व्हेज देखील असतात. जो पर्यंत मी त्या घरात होती, मला हेच वाटतं होते की मी स्वप्न पाहत आहे आणि कोणी मला लवकरच उठवणार आहे. मी त्यावेळी स्वत: खूप शांत ठेवले कारण त्यांच्यासमोर माझा उत्साह मला त्यांना दाखवायचा नव्हता.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे नवप्रीत म्हणाली, 'जेव्हा मी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासोबत डायनिंग टेबलवर बसले आणि पूजा ददलानी जी त्यांची मॅनेजर आहे, ते त्यावेळी हसत-मस्करी करत होते. तेव्हा माझा उत्साह आणखी वाढला. त्याला मी कंट्रोल करू शकत नव्हती. मी लगेच विचारलं की वॉशरुम कुठे आहे. त्यानंतर शाहरुख स्वत: त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि मला वॉशरुमजवळ घेऊन गेले. मी इतकी उत्साही झाली की मला वाटतं होती की मी जोरात ओरडू. पण मी एका रुमच्या आरशात पाहिलं आणि शांतपणे माझ्या मनात डोकावून पाहिलं तर तिथे मी आनंदान ओरडताना मला दिसली. हे संपूर्ण अविश्वसनीय होते. जेव्हा जेवण वाढलं तेव्हा एका घास खाल्यानंतर माझं पोट भरलं.'

हेही वाचा : 'या' व्यक्तीवर आहे पलक तिवारीचं एकतर्फी प्रेम! अभिनेत्रीचा खुलासा

पुढे शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाविषयी बोलताना म्हणाली, 'गौरी खूप स्वीट आहे. अबराम माझा नवीन बेस्ट फ्रेंड आहे, तो काही दिवसात मला विसरेल पण तरी. आर्यन खूप चांगला आहे. त्याचा जो अॅंग्री यंग मॅनचा लूक आहे त्याच्या विरुद्ध आहे. सुहानाचा अंदाजच वेगळा होता... अगदी प्रभावी आणि पूजा तर आयकॉनिक आहे. मी स्वत: अजून यावर विश्वास ठेवू शकली नाही की हे स्वप्न आहे. जेव्हा मन्नतमधून निघून माझ्या घरी जाण्याकडे निघाले तेव्हा शाहरुख खान मला दरवाज्यापर्यंत सोडण्यासाठी आले. बाहेर माझी कॅब होती. शाहरुखला पाहताच कॅब ड्रायव्हरनं संधी सोडली नाही त्यानं देखील शाहरुखसोबत सेल्फी काढली.' नवप्रीतची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.