गाडीत बसायला जाणार इतक्यात Alia Bhatt ओरडली...; असं काय घडलं मुंबई एअरपोर्टवर?

तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसून आलं. तिने सगळ्यांचे हात जोडून धन्यवाद केलं. 

Updated: Jul 10, 2022, 03:31 PM IST
गाडीत बसायला जाणार इतक्यात Alia Bhatt ओरडली...; असं काय घडलं मुंबई एअरपोर्टवर? title=

मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक मानलं जातं. आलियाचा प्रेग्नेंसीनंतर सध्या बॉलिवूडमध्ये तिचीच चर्चा होतेय. प्रेग्नेंट बॉलिवूड अभिनेत्रीची परंपरा आलियानेही पुढे नेली आहे. तिनेही बेबी बंपसोबत आगामी चित्रपटाचं काम पूर्ण केलंय.

'हॉर्ट ऑफ थ्रोन्स' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करु आलिया लंडनहून काल रात्री मुंबईत दाखल झाली. यावेळी नवरा आणि अभिनेता रणबीर कपूर तिला सरप्राईज देण्यासाठी पोहचला. त्याला पाहून आलिया एक्साइटेड झाली.

प्यार हो तो ऐसा...

या व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीरमधील बॉन्डिंग दिसून आलं. या दोघांचा हा प्रेमाचा क्षण तिथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेरात कैद केला. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडीओ नेटकरी वारंवार पाहत आहेत. आलियाला माहित नव्हतं की रणबीर गाडीत तिची वाट पाहत आहे.  त्याला पाहता क्षणीच आलियाचा आनंद गगनात मावत नाही. आलियाचं बेबी बंप पाहून रणबीरही आपल्या भावना रोखू शकला नाही आणि तिला मिठ्ठी मारली. त्यातील हा प्रेमाचा क्षण बघत राहावसा वाटतो.

आलिया लग्नापूर्वीच प्रेग्नेंट?

मुंबई विमानतळावर आलियाला पाहून उपस्थित लोकांनी आणि पत्रकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसून आलं. तिने सगळ्यांचे हात जोडून धन्यवाद केलं. आलिया आणि रणबीर यांचा लग्नाला 3 महिने झाले आहे. त्यामुळे आलियाचं बेबी बंप पाहून एक वेगळीच चर्चा रंगायला लागली आहे. आलिया लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती का?