MMS व्हायरल झाला अन् दुसऱ्याच दिवशी..., मोना सिंगनं केलं 'हे' काम

जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री...

Updated: Oct 8, 2022, 12:19 PM IST
MMS व्हायरल झाला अन् दुसऱ्याच दिवशी..., मोना सिंगनं केलं 'हे' काम title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मोना सिंगचा आज वाढदिवस आहे, काही वर्षांपूर्वी एक एमएमएस क्लिप व्हायरल झाल्याने मोना प्रसिद्धीच्या झोतात आली होती. जेव्हा मोनाला याची माहिती मिळाली तेव्हा ती तिच्या सोनीच्या शोच्या ‘क्या हुआ तेरा वादा’चे शूटिंग करत होती. 28 मार्च 2013 रोजी तिला याची माहिती मिळाली, तरीही ती 29 मार्च रोजी कामावर परतली होती. याविषयी नंतर अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, मात्र मोनानं तिच्यावर असलेल्या सगळ्या आरोपांचा विरोध केला. (Mona Singh Birthday Special) 

आणखी वाचा : 'जिसने भी उसे छोड़ा...', दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार नाही? एका बड्या व्यक्तीच्या पोस्टनं चर्चांना उधाण

त्यावेळी मोना म्हणाली होती की, असं काही घडलं हे अत्यंत लज्जास्पद आहे. कुणी एवढ्या टोकाला गेलय की कुणाचा चेहरा दुसऱ्याच्या अंगाशी जोडला गेलाय. माझ्यासोबत असे घडू शकतं तर हे कोणत्याही निष्पाप मुलीसोबत होऊ शकतं. मी एक सेलिब्रिटी आहे आणि मीडियाशी बोलू शकते याचा मला आनंद आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केवळ मीडियाच मला मदत करू शकेल. 

आणखी वाचा : 'त्यानं मला हॉटेलच्या रूममध्ये...', अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' धक्कादायक अनुभव

या घटनेवर कायदेशीर कारवाई करताना मोनानं सांगितलं की, जेव्हा मला हे समजलं तेव्हा मला धक्का बसला. माझ्यासोबत असं काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. आता अशा प्रकरणातून गेलेल्या मुलींबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे.

आणखी वाचा : 'सजना है मुझे' म्हणत अंजली अरोरानं शेअर केला 'हा' बोल्ड व्हिडीओ

दरम्यान, मोनानं आमिर खान आणि करीना कपूर स्टारर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात स्क्रिन शेअर केल्याने तिला या चित्रपटासाठी चांगलेच ट्रोल करण्यात आले. अनेकांनी सांगितले की, ती आमिरपेक्षा 17 वर्षांची लहान असूनही त्याच्या आईची भूमिका करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर मोनानं प्रतिक्रिया दिली होती की, या चित्रपटातील माझ्या कामाचं मला कौतुक होत आहे, मी खूप आनंदी आहे. मला वयात असलेल्या फरकाची काहीच समस्या नाही. 

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या 'त्या' लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

मोना सिंग पुढे म्हणाली की, ती या चित्रपटात आमिर खानची नाही तर लाल सिंगची आई झाली आहे. त्याचवेळी तो पुढे म्हणाला की, लाल सिंग चड्ढा हा आमिर खानचा बायोपिक नाही. मी 40 वर्षांची आहे आणि तो 57 वर्षांचा आहे, असे असूनही ही व्यक्तिरेखा साकारण्यात कोणतीही अडचण नसल्याचेही मोनाने स्पष्ट केले. (mona singh reached the shooting on the second day after mms went viral and played aamir khan s mother s role)