बीईंग ह्यूमन चॅरिटीच्या नावावर मनी लॉंड्रीग, अभिनव कश्यपचा आरोप

दुसऱ्यांचे करियर संपवणे, नेपोटीझ्म असे अनेक आरोप सलमानवर होतायत. 

Updated: Jun 21, 2020, 09:11 AM IST
बीईंग ह्यूमन चॅरिटीच्या नावावर मनी लॉंड्रीग, अभिनव कश्यपचा आरोप title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सलमान खान विरोधात सोशल मीडियात रोष पाहायला मिळतोय. दरम्यान बिईंग ह्यूमन चॅरिटीच्या नावावर मनी लॉंड्रीग होत असल्याचा आरोप अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंगचा दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यपने केलाय. त्याने याआधीही सलमानवर अनेकदा टीका केलीय. दुसऱ्यांचे करियर संपवणे, नेपोटीझ्म असे अनेक आरोप सलमानवर होतायत. 

बीईंग ह्यूमन चॅरीटी हा एक दिखावा आहे. बीईंग ह्यूमन ही सलीम साहेबांची सर्वात मोठी आयडीया आहे. त्यातली चॅरीटी हा एक दिखावा आहे. दबंगच्या शूटींग दरम्यान माझ्या डोळ्यासमोर पाच सायकल वाटल्या जायच्या आमि दुसऱ्या दिवशी दैनिकात दानशूर सलमानने पाचशे सायकल दिल्याच्या बातम्या यायच्या. मीडियासमोर, न्यायालयीन प्रकरणात सलमानच्या गुंड मवाली प्रतिमेला सुधारण्यासाठी हे सुरु असल्याचे अभिनवने म्हटले. 
 
आपल्या प्रभावाचा गैरवापर केल्याचा आरोप अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर केलाय. सलमानची फॅमिली ग्रुपिझम करतेय. सलमानला जे आवडत नाहीत त्यांना इंडस्ट्रीत काम मिळणं कठीणं असतं. त्यांच्या करियरमध्ये अडचणी येतात असेही त्याने म्हटले होते.

चॅरीटीच्या नावावर मनी लॉंड्रींग 

आज बीईंग ह्यूमनमध्ये पाचशे रुपयांची जीन्स ५ हजारांना विकली जातेय. कोणत्या माध्यमातून चॅरीटीच्या नावावर मनी लॉंड्रींग सुरु आहे हे सांगता येत नाही. सर्वसाधारण जनतेच्या डोळ्यात धूळ टाकून हे पैसे गोळा केले जातायत. कोणाला काही देण्याची याची प्रवृत्ती नाही. फक्त घेण्याची वृत्ती आहे. सरकारने बीईंग ह्यूमनची चौकशी करायला हवी. मी यामध्ये सहकार्य करेन असे अभिनवरने आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय. 

अभिनव कश्यप याने सलमान आणि त्याच्या परिवारावर आरोप केलेयत. दरम्यान गायक सोनू निगम याने देखील सलमानवर हल्ला चढवला. दोन व्यक्तींचा संगीतक्षेत्रातही दबदबा असून कोणी काय गायचं हे ठरवलं जातं. यामुळे संगीत क्षेत्रावर परिणाम होईल. या क्षेत्रातही आत्महत्या होऊ शकते असेही सोनू निगमने स्पष्ट केले.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानचे पोस्टर्स जाळण्यात आले. बिहारमध्ये सलमानच्या बिईंग ह्यूमन या आऊटलेटवर सुशांतच्या चाहत्यांनी हल्ला चढवला. जागोजागी लागलेले सलमानचे पोस्टर्सदेखील फाडून टाकण्यात आले.