पुणे : जेष्ठ अभिनेत्री शबाना अझमी यांचा काही दिवसांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. मुंबई-पुणे महामार्गावर त्यांचा अपघात झाला तेव्हा तेथे उपस्थित असलेला एक जवान त्यांच्या मदतीसाठी तात्काळ धावून आला. शबानांना वाचवण्यासाठी २ की.मी धावणाऱ्या जवानाचे नाव विवेकानंद योगे असं आहे. योगे यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लाइफ सेव्हिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने संयुक्त पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत योगे यांना सन्मानित केले. ते महाराष्ट्र सुरक्षा दलात (एमएसएफ) कार्यरत आहेत.
जवान विवेकानंद योगेंच्या अतुलनीय कामगिरीनंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर शबाना आझमींच्या मदतीसाठी अखेर भारतीय जवानच पुढे आला अशा आशयाच्या प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी दिल्या हेत्या. शिवाय काहीनी त्यांच्या कामाला सेल्यूट देखील केले.
#ShabanaAzmi being taken for treatment by the same army man whom she abuses on a daily basis pic.twitter.com/n3NjCgcRVl) January 18, 2020
अपघातामध्ये शबाना आझमींच्या डोळ्यांला आणि डोक्याला अधिक मार लागला होता. शबाना आझमींच्या अपघाताची बातमी कळताच बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात दाखल झाले. आता त्यांची परिस्थिती स्थिर आहे.
एकंदरच सोशल मीडियाच्या माध्यमातून माणुसकीच्या नावावर जिथे संताप आणि घृणेच्या भावनेचं दर्शन झालं तिथेच या समाजातील माणुसकी जपणाऱ्यांनी पुढाकार घेत चुकीच्या गोष्टींना पुरतं ठेचण्याचा प्रयत्न केला असं म्हणणं गैर ठरणार नाही.