'या' अभिनेत्याची कधीच चेष्टा करणार नाही, असं का म्हणाला Munawar Faruqui?

मुनावर फारुकी 'या' अभिनेत्याचा इतका आदर का करतो? कोण आहे हा बॉलिवूड अभिनेता?

Updated: Aug 23, 2022, 09:02 PM IST
 'या' अभिनेत्याची कधीच चेष्टा करणार नाही, असं का म्हणाला Munawar Faruqui? title=

मुंबई:बॉलिवूडची क्वीन कंगणा रणौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोचा विनर स्टँडअप कॉमेडीअन मुनावर फारुकी ठरला होता. मुनावर फारुकीचे अनेक राज्यात कॉमेडीचे शो होत असतात. या शोला प्रत्येक राज्यात विरोध होत असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. संध्या मुंबईतही त्याचे शो होणार आहेत, त्यामुळे त्यालाही विरोध होत असून ते रद्द करण्यात येतायत. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. 

स्टँडअप कॉमेडीअन मुनावर फारुकी त्याच्या शोमध्ये हिंदु देवी-देवतांचा अपमान करत असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. तसेच तो त्याच्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेते आणि राजकिय नेत्यांवर देखील टीका करताना दिसतो.मात्र बॉलिवूडमध्ये या अभिनेत्याची कधीच चेष्टा करणार नसल्याचे विधान मुनावर फारूकीने केली आहे. त्यामुळे हा अभिनेता कोण आहे अशी चर्चा रंगली आहे. 

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत मुनावर फारूकीने एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याबद्दल आदर व्यक्त केलाय. मुनावर फारूकी म्हणतो, तो एक हूशार माणूस आहे. इतकं नाव आणि प्रसिद्धी मिळवून सुद्धा त्याच्याकडे खूप वेगळं आकर्षण आहे. तुम्ही फक्त त्यांना पाहतच राहाल, असेही तो म्हणालाय. 

मुनावर फारूकीने यावेळी शाहरूख खानची कधीच खिल्ली उडवणार नाही अशी कबूली दिली. तसेच सुपरस्टारचा मनापासून आदर करतो, असेही त्याने यावेळी म्हटले. मनापासून त्यांचा खुप आदर करतो. मी कधी त्यांची खिल्ली उडवू शकत नाही, असे त्याने म्हटले. 

मुनावर फारुकीने असेही नमूद केले की, मला आयुष्यात कधीतरी शाहरुख खानसोबत काम करायला आवडेल, असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान आता मुनावर फारूकीची इच्छा पुर्ण होते का हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे.