Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू यांची जोडी लोकप्रिय आहे. फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यातही ते एकत्र सुंदर दिसायचे. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या दोघांची भेट ही माया चेसावे या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन वासुदेव मेननं केलं आहे. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभूनं 2017 साली सप्तपदी घेतल्या. नागा चैतन्य आणि समांथा यांनी अचानक 2021 साली घटस्फोट घेतला. त्यांनी घटस्फोटाची बातमी दिल्यानंतर नेटकऱ्यांनी या बातमीनं त्यांना धक्काबसल्याचे सांगितले होते. सध्या नागा चैतन्य त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तर समांथा तिच्या बॉलिवूडमधील कामावर लक्ष केंद्रित करत आहे. यासगळ्यात नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत समांथावर वक्तव्य केलं आहे.
नागा चैतन्यनं ही मुलाखत ई टाइम्सला दिली होती. या मुलाखतीत नागानं समांथाची खूप स्तुती केली. नागा चैतन्य म्हणाला, आम्ही विभक्त होऊन आता दोनहून अधिक वर्षे झाली आणि आम्ही अधिकृत घटस्फोट घेऊन एक वर्ष झाला. त्यानंतर आम्ही दोघेही मागचा विचार न करता आपापल्या आयुष्यात पुढे निघालो आहोत. समांथाही एक चांगली मुलगी आहे आणि जगातली सगळी सुखे मिळण्यासाठी ती पात्र आहे. पण आम्हाला अनेकदा आमच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले जातात त्यामुळे आमच्यात एक संकोच निर्माण होतो. आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे आणि या प्रश्नांमुळे कुठे तरी त्याला धक्का पोहोचतो. याचे मला खूप दुःख होते.'
हेही वाचा : तीन वर्षे काम नाही... वडिलांच्या उपचारासाठी 'या' अभिनेत्यावर घरातच्या महागड्या वस्तू विकण्याची वेळ
समांथा लवकरच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणाऱ्या तिच्या सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. पण समांथा त्याच्या इंडियन व्हर्जनमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता वरुण धवन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय समांथा लवकरच आयुष्मान खुरानासोबत दिसणार असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय ती विजय देवरकोंडासोबत कुशी या चित्रपटात देखील दिसणार आहे. तर नागा चैतन्य विषयी सांगायचं झालं तर त्यानं ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच तो वेंकट प्रभूच्या कस्टडी या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.