'हे सगळं बकवास आहे,' नाना पाटेकरांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर स्पर्धकाला स्पष्टच सांगितलं, VIDEO व्हायरल

ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल 15' (Indian Idol 15) मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एका स्पर्धकासमोर परखडपणे आपली मतं मांडली.   

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2024, 06:15 PM IST
'हे सगळं बकवास आहे,' नाना पाटेकरांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर स्पर्धकाला स्पष्टच सांगितलं, VIDEO व्हायरल title=

ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल 15' (Indian Idol 15) मध्ये हजेरी लावली. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये नाना पाटेकरांनी मिकमे बोसू (Myscmme Bosu) या स्पर्धकाशी संवाद साधला. यावेळी त्यांना तिचा अंकशास्त्रावर (Numerology) विश्वास असल्याचं समजताच अनेक प्रश्न विचारले. तसंच अंकशास्त्र मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे.

प्रोमोमध्ये दिसत आहे की, नाना पाटेकर मिकमे बोसूला विचारतात, "तुझा अंकशास्त्रावर विश्वास आहे का?". जेव्हा ती हो असं उत्तर देते तेव्हा नाना पाटेकर तिला कोण ही स्पर्धा जिंकणार सांग असं विचारतात. यानंतर मिकमे बोसू निशब्द होते. यानंतर नाना पाटेकर तिला माझं वय किती असेल सांग असा प्रश्न विचारतात. यावेळी मिकमे बोसू पुन्हा निशब्द होते आणि समालोचन कऱणाऱ्या आदित्य नारायणकडे पाहू लागते. 

'तुझं अकंशास्त्र बकवास आहे'

नाना पाटेकर यावेळी हसून तिला सांगतात की, "तुझं हे जे काय अंकशास्त्र आहे ते बकवास आहे ना? तू हे सगळं सोड आणि बिनधास्त गा. हेच खरं आहे, बाकी सगळं सोडून दे".

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "बेबाक नाना बोलले. जर तुमचं पूर्ण लक्ष्य गाण्यावर असेल तर बाकी कशाची गरज नाही".

नेटकरी झाले व्यक्त

या व्हिडीओवर नेटकरी व्यक्त झाले आहेत. 'बिचारी नानांचे प्रश्न ऐकून टेंशनमध्ये आली'. तर एकाने कौतुक केलं असून हे खोल विचार असल्याचं सांगितलं. 

इंडियन आयडॉल 

या सीझनमध्ये आदित्य नारायण समालोचक म्हणून परतला आहे. श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह या शोचे जज आहेत. इंडियन आयडॉल 15 सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर रात्री 9 वाजता प्रसारित होईल. शोचा पहिला सीझन 2004 मध्ये प्रसारित झाला.

नाना पाटेकर यांच्या पुढच्या चित्रपटाबद्दल

नाना पाटेकर आता उत्कर्ष शर्मासोबत 'वनवास' चित्रपटात दिसणार आहे. 20 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित वनवास हा चित्रपट झी स्टुडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात खुशबू सुंदर, राजपाल यादव आणि सिमरत कौर यांच्याही भूमिका आहेत.