सारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, 'त्या' फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नवीन नात्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिचं नाव आता कोट्याधीश अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडलं जात आहे.   

Intern | Updated: Dec 3, 2024, 04:58 PM IST
सारा अली खानच्या नवीन नात्याची चर्चा, 'त्या' फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष title=

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिच्या नवीन नात्याबद्दल अनेक वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तिने अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.  सध्या साराचं नाव कोट्याधीश उद्योजक अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडलं जात आहे. या चर्चेला आणखी हवा मिळण्याचं कारण म्हणजे, दोघांनी एकत्र फोटो जरी शेअर केले नसतील तरी  एकाचं ठिकाणी काढलेले फोटो शेअर केले आहेत. कथित असलेलं हे जोडपं डिसेंबरची सुट्टी एकत्र साजरी करत आहे.

साराने राजस्थानमधील थार वाळवंटात सफारीचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या जॅकेटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या जॅकेटवर 'सिंबा' असं लिहिलं होतं, ज्यामुळे तिच्या चाहत्यांच्या नजरा त्या फोटोवर खिळल्या. दुसरीकडे, अर्जुनने एका आलिशान रिसॉर्टच्या जिममधील फोटो शेअर केला. त्यांनी एकत्र फोटो शेअर केले नसल्यामुळे या नात्याबद्दलची औपचारिक घोषणा अजून झाली नाही. काहींनी याला 'गुप्त प्रेमकथा' असं म्हणत जोरदार चर्चा सुरू केली आहे. सध्या तरी सारा किंवा अर्जुनकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण चाहत्यांच्या मते, या दोघांमधील कथित नात्याची सुरुवात खूपच गुप्तपणे आणि खासगी पद्धतीने होत आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये सारा केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तेथील साराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अर्जुनही त्याच वेळी केदारनाथला गेला होता. दोघांचे मंदिरात दर्शन घेतानाचे व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत. साराने लाल स्वेटर आणि पांढऱ्या पॅंटमध्ये तर अर्जुनने गडद जॅकेट आणि तापकीरी पॅंटमध्ये दर्शन घेतलं. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याविषयीचे कयास वाढवत आहे.  यापूर्वी साराचं नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडलं गेलं होतं. 'लव्ह आज कल'च्या शूटिंगदरम्यान दोघं डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.  

साराने तिच्या नवीन नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अर्जुन आणि साराचे फोटो आणि व्हिडिओ पाहता चाहत्यांच्या मनात तर्कवितर्क सुरू आहेत.  सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा यांच्यात खरंच काही खास आहे का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.