'आपला मानूस' या सिनेमाचा अफलातून ट्रेलर

अजय देवगण निर्मित आपला मानूस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 19, 2018, 07:45 PM IST
'आपला मानूस' या सिनेमाचा अफलातून ट्रेलर  title=

मुंबई : अजय देवगण निर्मित आपला मानूस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. उत्कृष्ठ कलाकारांची संगत या सिनेमाला लागली आहे. आपला मानूस चित्रपटाच्या टीझरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत असून याच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षित केले होते.नाना पाटेकर,सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.

या ट्रेलर मध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून या भूमिका साकारल्या आहेत,अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे.वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो.ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे.मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबा विषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात.

वायाकॉम18 मोशन पिक्चर्स चे सीओओ, अजित अंधारे म्हणाले,“आमचा २०१८ मधील पहिला मराठी सिनेमा-आपला मानूस - सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे एक असा सिनेमा ज्यातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आणि वेगळ्या कथा असलेले सिनेमे देण्याचा आमचा हेतू प्रतिबिंबीत होतो आहे.या सिनेमात नामवंत कलाकार काम करत आहेत नाना पाटेकर पासून ते सुमित राघवन आणि ईरावती हर्षे पर्यंत आणि या सर्वांचा कॅप्टन आहे अतिशय गुणवान दिग्दर्शक सतीश राजवाडे.