Navya and Shweta on Jaya Bachchan's behaviour : बॉलिवूड दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत असण्याचं कारण हा तिचा पॉडकास्ट 'व्हाट द हेल नव्या' आहे. नव्याच्या या शोचया दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये नव्या तिच्या आईसोबत आजच्या जगातील मैत्री आणि नात्यावर चर्चा करताना दिसली. त्यांचा हा एपिसोड सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.
पॉडकास्ट शो 'व्हाट द हेल नव्या' मध्ये श्वेता बच्चन, जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा प्रत्येक विषयावर स्पष्टपणे वक्तव्य करताना दिसली. यावेळी त्या दोघी जया बच्चन यांच्याविषयी बोलताना दिसल्या. त्या दोघांचं म्हणणं आहे की जया बच्चन या त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या चांगल्या मैत्रिण आहेत. श्वेता तिची आई जया बच्चन यांच्याविषयी म्हणाली की "आई, बोलताना कोणतंही फिल्टर वापरत नाही. जे तिच्या मनात असतं तेच ती बोलते. इतकंच नाही तर माझ्या मित्र-मैत्रिणींना माझ्या आईसोबत फिरायला खूप आवडतं. आई जेव्हा कधी कोणाला ओरडते, तेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणींना मज्जा येते. मला कधी-कधी वाटतं की माझ्या मित्र माझ्यापेक्षा जास्त चांगले मित्र माझ्या आईचे आहेत."
नव्या नवेली नंदा तिची आजी जया बच्चन यांच्याविषयी बोलताना म्हणाली, "आजी खूप चिल आहे. माझ्या मित्र-मैत्रिणींना देखील ती खूप आवडते." हे ऐकताच श्वेता बोलते, "आई आणि चिल मुळीच नाही. सतत तिच्या डोक्यात काही ना काही सुरु असतं."
हेही वाचा : शरद केळकरला हिंदीत करायचाय लीड रोल पण...; मराठमोळा अभिनेता 'या' एका प्रश्नाने हैराण
आणखी पुढे जया बच्चन यांच्याविषयी खुलासा करत नव्या म्हणाली की "जया बच्चन यांना तरुणांसोबत फिरायला खूप आवडतं. आजीला हे जाणून घ्यायचं असतं की आजकालचे तरुण काय विचार करतात? आणि हा विचार त्या का आणि कशामुळे येतो? हे सगळं जाणून घेण्यास आजीला खूप उत्सुकता असते. ती सेटवर सगळ्यांशी बोलते. माझे अनेक मित्र-मैत्रिणी आजीचे देखील मित्र आहेत." याशिवाय यावेळी त्यांनी बेस्ट फ्रेंडशी लग्न करायचं की नाही याविषयी देखील चर्चा केली तर जया बच्चन आणि श्वेता नंदा या दोघींनी यावर त्यांचं काय मत आहे हे सांगितलं आहे.