लग्नाकरता धर्म बदलूनही 35 वर्षीय अभिनेत्री अजूनही अविवाहित

कोण आहे ही साऊथची अभिनेत्री 

Updated: Nov 17, 2019, 06:27 PM IST
लग्नाकरता धर्म बदलूनही 35 वर्षीय अभिनेत्री अजूनही अविवाहित

मुंबई : 'इमइक्का नोडिगल', 'कोलाइथुर कालम', 'जय सिम्हा', 'कोको' सारख्या सिनेमांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री नयनतारा यांचा 18 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. 2003 मध्ये एका मल्याळम सिनेमात काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच तिने तामिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. आतापर्यंत नयनतारा यांनी यशस्वी सिनेमे दिले आहेत. आता त्यांची ओळख सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये झाली आहे. 

नयनतारा यांच खरं नाव 'डायना मरियम कुरिअन' असं आहे. नयनतारा यांचा फिल्मी सफर खूप खास राहिला आहे. मात्र प्रेमाचा प्रवास मात्र खडतर आहे. एकेकाळी नयनतारा आणि प्रभूदेवा यांच्या अफेअरची खूप चर्चा होती. मात्र ते दोघे एकमेकांपासून दूर झाले. 

नयनताराने प्रभूदेवा यांना डेट करायला सुरूवात केली तेव्हा त्याच लग्न झालं असून त्याला 3 मुले होती. पण प्रेमात दोघे एवढे बुडाले होते की, त्यांना भान राहिलं नाही. दोघांनी लिवइनमध्ये राहण्यास सुरूवात केली होती. 

याची माहिती जेव्हा प्रभूदेवाच्या पत्नीला झाली तेव्हा तिने 2010 मध्ये फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये प्रभूदेवा आणि नयनतारा लिवइनमध्ये राहत असल्याचा खुलासा केला होता. प्रभूदेवा यांच्या पत्नीने धमकी दिली की,जर त्यांनी लग्न केलं तर त्या उपोषण करतील. तेव्हा नयनतारा यांच्या विरोधात अनेक आंदोलन देखील झाली. 

पण प्रभूदेवा नयनताराच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की, त्यांनी 16 वर्षाचं लग्न मोडून 2011 मध्ये आपली पत्नी लताला घटस्फोट दिला. याबदल्यात त्यांना 10 लाख रुपयांसोबत काही मालमत्तेचा हिस्सा देखील द्यावा लागला. 

मात्र यानंतर नयनतारा यांनी प्रभूदेवांसोबत असलेलं नातं संपवलं. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा नयनतारांनी प्रेमा खातर धर्म देखील बदलला होता. नयनतारा या जन्माने ख्रिश्चन होत्या पण त्यांनी प्रभूदेवांसोबत लग्न करण्यासाठी 2011 मध्ये हिंदू धर्म स्विकारला. मात्र 35 वर्षांच्या नयनतारा आजही अविवाहित आहेत.