फोन तोडेन मी....; मंदिर, रेल्वे स्टेशनवर Nayanthara चा संताप, चाहत्यांवर कधी नव्हे ती आगपाखड

Nayanthara Gets Angry On Fans in Temple : नयनतारा ही दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक असून तिचे लाखो चाहते आहेत. कुटुंबासोबत मंदिरात दर्शन घेण्यासाठी नयनतारा पोहोचली होती. त्यावेळी असं काही झालं की नयनताराचा तिच्या सगळ्या चाहत्यांवर संपात अनावर झाला. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 10, 2023, 11:54 AM IST
फोन तोडेन मी....; मंदिर, रेल्वे स्टेशनवर Nayanthara चा संताप, चाहत्यांवर कधी नव्हे ती आगपाखड title=
(Photo Credit : Polimer News Youtube/ social media)

Nayanthara Gets Angry On Fans in Temple : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनताराचे (Nayanthara) लाखो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना ती कुठे जाते, काय करते हे सगळं जाणून घेण्यासाठी उस्तुक असतात. नयनताराचे चाहते तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या नयनतारा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओत नयनतारा ही तिचा पती विग्नेश शिवनसोबत मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. तिथला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, यावेळी नयनतारानं तिच्या चाहत्यांसोबत असं काही केलं की नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. 

नयनतारानं पंगुनी उथीरामच्या निमित्तानं संपूर्ण कुटुंबासोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती. पंगुनी उथीराम हा दाक्षिणेतील एक सण आहे. यामुळे नयनतारा आणि विग्नेश (Vignesh Shivan) संपूर्ण कुटुंबासोबत कुंभकोणम जवळ असलेल्या कामाक्षी अम्मन मंदिरात गेले होते. त्या दोघांना पाहून तिथे अनेकांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे त्यांना जसं दर्शन करायचं होतं तसं करता आलं नाही. त्यामुळे नयनताराला प्रचंड राग आला. त्यावेळी त्यांना कॅमेऱ्यात स्पॉट करण्यात आलं. दरम्यान, या व्हिडीओत नयनतारा तिच्या एका चाहत्यासोबत ज्या प्रकार बोलली ते अनेकांना आवडलेलं नाही.  

हेही वाचा : सांगायलाही किळस वाटते, बाजारात एका व्यक्तीनं...; Shefali Shah चा मोठा खुलासा

नयनतारातं असं रावनं चाहत्यांना आवडलं नाही. तिनं चाहत्यांना असं ओराडायला किंवा त्यांच्यावर चिडायला नव्हत पाहिजे, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, त्यांचा स्टेशनवरील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नयनतारा आणि विग्नेशच्या आजुबाजूला असलेल्या गर्दीला सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसले. विग्नेश सगळ्या फॅन्सना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते अशात नयनताराच्या रागा अनावर झाला आणि ती मोठ्यानं चाहत्यांवर ओरडली. इतकंच काय तर जो चाहता तिचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत होतो, त्याला फोन तोडण्याची धमकी नयनतारानं दिली. 

नयनताराच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ती दाक्षिणेतील नंबर वन अभिनेत्री आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. दरम्यान, लवकरच नयनतारा शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटात दिसणार आहे. तर हा नयनताराचा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. या आधी नयनतारा 'कनेक्ट' या चित्रपटात दिसली होती. तर याशिवाय नयनतारा ही 'इरॅवन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नयनतारा आणि जयम रवि एकत्र दिसणार आहेत.