एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराला क्लीन चीट?

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...

Updated: Sep 30, 2020, 07:18 PM IST
एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराला क्लीन चीट?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आत्महत्या प्रकरणाशी जोडूनच चौकशी सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणावरही दर दिवशी नवा खुलासा होऊ लागला आहे. इतकंच नव्हे. तर, नव्या चर्चांना वावही मिळू लागला आहे. यातच आता अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पदुकोण यांना एनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. एकाएकी या अभिनेत्रींना चौकशीनंतर लगेचच क्लीन चीट मिळाल्याच्या चर्चांनी जोर धरताच एनसीबीकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला. 

मुख्य म्हणजे क्लीन चीट मिळण्याच्या या सर्व चर्चा एनसीबीकडून धुडकावून लावण्यात आल्या आहेत. हल्लीच माध्यमांम्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्ताद्वारे यासंबंधीची माहिती देण्यात आल्याचं म्हटलं गेलं. जेथे एकेकाळी दिपिकाची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या करिष्मा प्रकाश, खुद्द दीपिका, सारा, श्रद्धायांच्यासह इतरांनाही ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं क्लीन चीट दिल्याचं म्हटलं गेलं होतं. पुढं याविषयीच्या बऱ्याच चर्चांनीही जोर धरला. परिणामी एनसीबीनंच अखेर सत्य सर्वांसमोर आणलं. 

 

एनसीबीच्या हाती सध्या ड्रग्ज प्रकरणी अनेक पुरावे लागत आहेत. सध्याच्या घडीला तीन मोठ्या सेलिब्रिटींची नावं यात पुढं आलेली असतानाच या प्रकरणीच्या तपासाला आणखी वेग आला आहे. ज्यामध्ये ठोस पुरावे मिळताच या तीनही सेलिब्रिटींच्या नावेही समन्स बजावण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्येच हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे तिन्ही कलाकार बी- टाऊनमधील आघाडीच्या सेलिब्रिटींच्याच यादीतील आहेत. पण, अद्यापही त्यांच्या नावांबाबत मात्र गोपनीयता पाळण्यात आलेली आहे.