close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'ब्लिंकिंग गर्ल' प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल...

प्रिया वारियर गाण्याचे सूर छेडताना

Updated: Jun 26, 2019, 05:41 PM IST
'ब्लिंकिंग गर्ल' प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल...

मुंबई : 'माणिक्य मलरया पुवी' या गाण्यातील अवघ्या काही सेंकंदाच्या दृश्यामुळे प्रिया वारियर चांगलीच चर्चेत आली होती. 'ब्लिंकिंग गर्ल' म्हणून क्षणार्धात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. प्रियाचा हा अंदाज फार कमी वयात तिला प्रसिद्धी देऊन गेला. 

'ओरू अदार लव्ह' या चित्रपटानंतर प्रिया मल्याळम चित्रपट सृष्टीत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. पाहता पाहता तिच्या अभिनयाची प्रशंसा सुरू झाली. सध्याच्या घडीला प्रिया सहकलाकार रोशन अब्दुल रहूफ याच्यासोबतच्या खास मैत्रीमुळे चर्चेत आहे. शिवाय तिने कारकिर्दीत नवं आव्हानही पेललं आहे. 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यांची एक झलक तिच्या चाहत्याच्या भेटीला आणली आहे. ज्यामध्ये प्रिया चक्क एका सुरेख गाण्याचे सूर छेडताना पाहायला मिळत आहे. 
प्रिया तिच्या आगामी चित्रपट 'फाइनल्स'साठी एक रोमॅन्टीक गाणं गाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचा हा एकंदर अंदाज पाहता प्रिया तिच्या अभिनयासोबतच गायनातही सुद्धा नशीब आजमावत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रिया अत्यंत कमी वेळात प्रसिद्धीझोतात आली. एका रात्रीतच प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडिया इंटरनेट सेंशेसन झाली. सर्वांत जास्त सर्च होणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतही तिची गणती झाली. आता तिचा हा अंदाज पाहता येत्या काळात ही प्रसिद्धी टिकवून ठेवण्यास प्रिया यशस्वी ठरते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.