चाहत्यांसाठी मोठा धक्का! गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने 'या' डान्सरला केलं प्रपोझ : VIDEO

नीरजने प्रपोझ करण्याची हटके स्टाईल 

Updated: Sep 28, 2021, 06:44 AM IST
चाहत्यांसाठी मोठा धक्का! गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने 'या' डान्सरला केलं प्रपोझ : VIDEO  title=

मुंबई : जेव्हापासून एथलीट नीरज चोप्राने टोक्यो ऑल्मपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल आहे. तेव्हापासून त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. आता तो अगदी नॅशनल क्रश ठरला आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. नीरज चोप्राचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. नीरज चोप्राने एका डान्सरलाच प्रपोझ केलं आहे. 

नीरज चोप्रा रिऍलिटी शो डान्स प्लस 6 मध्ये येणार आहे. येत्या एपिसोडमध्ये तो डान्सर शक्ती मोहनला प्रपोझ करताना दिसणार आहे. नीरजच्या गर्ल्स फॅन फॉलोइंगसाठी हा मोठा धक्का आहे. हा व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. 

नीरजने केलं शक्ती मोहनला प्रपोझ 

डान्स प्लस 6 मध्ये नीरज चोप्रा स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे. याचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शक्ती मोहन एथलीट नीरज चोप्राला आपल्याला प्रपोझ करण्यास सांगत आहे. नीरज स्टेजवर येतो आणि शक्तीला प्रपोझ करतो. नीरजचा शक्तीला प्रपोझ करण्याचा अंदाज अतिशय वेगळा आहे. नीरज म्हणतो की, त्याचं पहिलं प्रेम हे जॅवलीनच आहे. त्याला जेवणही बनवता येत नाही. तसेच तो शक्तीला हवा तितका वेळही देऊ शकत नाही. 

राघवला आवडली नाही नीरजची ही गोष्ट 

नीरजची ही प्रपोझची स्टाईल कार्यक्रमाचा होस्ट राघवला आवडली नाही. तेव्हा त्याला राहवत नाही. तो यावर कमेंटकरता म्हणतो की, भाई तू चुकीच्या जागी जॅकलीन फेकलं आहेस. यावर सगळे लोकं हसतात. डान्स प्लस 6 च्या प्रेक्षकांसाठी ही खास गोष्ट आहे.