फॅट ते फिट शहनाज गिलचा प्रवास; जाणून घ्या अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र

  फिल्मस्टार असो किंवा सामान्य माणूस, वजन कमी करणं हे प्रत्येकासाठीच कठिण काम असतं. 

Updated: Mar 29, 2022, 08:12 PM IST
फॅट ते फिट शहनाज गिलचा प्रवास; जाणून घ्या अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र title=

मुंबई :  फिल्मस्टार असो किंवा सामान्य माणूस, वजन कमी करणं हे प्रत्येकासाठीच कठिण काम असतं. शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळण्यासोबतच आहारातही बदल करावा लागतो. मात्र आता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बिग बॉस 13 फेम शहनाज गिलचा फिटनेस मंत्र या सगळ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

बिग बॉस 13 मधून बाहेर पडल्यानंतर शहनाज गिल तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन लूकमुळे चर्चेत आली आहे. दररोज तिच्या ग्लॅम लुकचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.  आता समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये शहनाज गिलने सांगितलं आहे की,  'लॉकडाऊनमध्ये, काहीतरी नवीन का करू नये? लोकं माझ्याकडे पाहून म्हणतील की ही तीच शहनाज आहे?

शहनाजच्या म्हणण्यानुसार, तिने इंडियन नाश्ता घेऊन तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. ती नाश्त्यामध्ये डोसे, मेथीचे पराठे खायची आणि तिच्या आहारावर लक्ष ठेवायची. इतकंच नाही,  आपल्या डाएटवर कॉन्सट्रेट करण्यासाठी तिने सगळ्यात आधी आपल्या इच्छाशक्तीवर लक्ष केंद्रित केलं. अशाप्रकारे शहनाज गिलने फिटनेसला घेवून अवघड काम मोठ्या जोमाने पार पाडलं आणि स्वत:ला पूर्णपणे बदलून टाकलं. शहनाज गिलने ही माहिती शिल्पा शेट्टीच्या मिर्ची शेप ऑफ यू या शोमध्ये दिली. जिथे ती पाहुणी म्हणून पोहोचली होती.

शहनाजच्या सौंदर्याचं रहस्य
त्याचबरोबर, जर शहनाजच्या सौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर ती यासाठी कोणतीही विशेष किंवा महागडे प्रोडक्ट्स वापरत नाही. मात्र तिच्या त्वचेची ती खूप  काळजी घेते. तसंच,  ती दिवसभर भरपूर पाणी पिते, ज्यामुळे तिची त्वचा हायड्रेट राहते.