'दिग्दर्शकांसोबत कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत'

त्यामुळे अनेक प्रोजेक्ट देखील हातून गेले अभिनेत्रीचा खुलासा  

Updated: Dec 3, 2019, 01:07 PM IST
'दिग्दर्शकांसोबत कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत'

मुंबई : आजकाल कास्टिंग काउचच्या घटना सर्सार समोर येत असतात. याच कास्टिंग काउचमुळे अभिनयात रस असलेल्या असंख्य महिला कलाकारांना आपल्या आवडीवर पडदा टाकावा लागतो. असांच काहीसा अनुभव शेअर केला आहे अभिनेत्री नरगिस खाख्रीने. 'रॉकस्टार' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या नरगिसने एक्स पोर्न स्टार ब्रिटनी दे ला मोरासोबत संवाद साधताना काही गोष्टींचा खुलासा स्पष्टपणे केला. 

नरगिसकडे देखील अनेक दिग्दर्शकांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पण तिने त्यांची ही मागणी कधीही पूर्ण केली नाही. तर मागणी मान्य न केल्यामुळे तिच्या हातून अनेक प्रोजेक्ट्सही गेले. स्वत:च्या जीवनातील कठीण प्रसंगांचा खुलासा तिने 'eXXXamin' इंटरनॅशनल पॉडकास्टच्या माध्यमातून केला. 

'आपल्या आयुष्याची चौकट आपण ठरवायला हवी. मला ठाऊक होतं काय करायला हवं आणि काय नको. त्यामुळे मी कलाविश्वात पाय ठेवला. मी माझ्या मुल्यांवर ठाम होती.' अशा कोणत्या सीमा होत्या ज्यांमूळे तू कधी भरकटली नाहीस? या गोष्टी श्रेय आईला देत तिने उत्तर दिले. 

'माझ्या आयुष्यातले नैतिक मुल्य मला माझ्या आईकडून मिळाले आहेत. पण तिने मला अशा गोष्टींसाठी योग्य मार्गदर्शन दिलं नाही. त्याऐवजी पुरुष, लैंगिक संबंधांबद्दल तिने मला खूप घाबरवले. तिच्यामूळे मला नैतिक मुल्यांचं दर्शन झालं.'

ती पुढे म्हणाली, 'मी नेहमी दुसऱ्याने केलेल्या चुकांमधून शिकत असते आणि कोणतीही चूक पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करते. माला प्रसिद्धीची भूक कधीच नसल्याने मी न्यूड फोटोशूट देखील केले नाही. शिवाय कोणत्या दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध देखील ठेवले नाहीत.' नरगिसच्या या मुल्यांमुळे तिच्या हातून अनेक प्रोजेक्ट देखील गेले. ती खचली देखील. पण फक्त अभिनयातूनच यश मिळवता येत नाही, तर यशाचे शिखर गाठण्यासाठी अन्य पर्याय देखील असल्याचे ती म्हणाली. 

'रॉकस्टार' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केलेल्या नरगिसने 'हाऊसफुल ३', 'मैं तेरा हिरो', 'बँजो', 'अजहर', 'फटा पोस्टर निकला हिरो', '५ वेडिंग्स' चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.