close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'आ राहा है दोबारा, अब कोई रोक नही सकता...', 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

Updated: May 20, 2019, 04:42 PM IST
'आ राहा है दोबारा, अब कोई रोक नही सकता...', 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

मुंबई : 'आ राहा है दोबारा, अब कोई रोक नही सकता...' अशी टॅगलाईन असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं. या पोस्टरमध्ये 'पीएम नरेंद्र मोदी' शंखनाद करताना दिसत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचा विरोध आणि आचरसंहिता विचारात घेवून चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली होती. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर २४ मे रोजी 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटगृहात दाखल होणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. विवेकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'भारत देशात प्रत्येक मोठ्या कामाची सुरूवात शंखनादाने केली जाते' असे लिहले आहे. त्याने शेअर केलेला हा पोस्टर करताच चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तेव्हा आता या शंखाचा नाद किती दूरवर गुंजणार हे पाहणे अतीव महत्त्वाचे ठरणार आहे. 

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी मेजवानी रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विवेक ओबेरॉयची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका अभिनेता मनोज जोशी साकारणार आहेत. या कलाकारांशिवाय चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, प्रशांत नारायणन, झरीना वहाब, बरखा बिष्त सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता आणि अक्षत आर.सलूजा या कलाकारांची भूमिकासुद्धा महत्वाची ठरणार आहे.