वडिलांची हत्या करण्याचा कट रचणारा 'शैतान का साला'

२६ ऑक्टोबर रोजी हा विनोदी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Oct 20, 2019, 07:28 PM IST
वडिलांची हत्या करण्याचा कट रचणारा 'शैतान का साला'

मुंबई : फरहाद शामजी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेल्या 'हाउसफुल ४' चित्रपटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. ट्रेलर प्रदर्शनानंतर चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निर्माते सलग चित्रपटाचे प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित करत आहेत. नुकताच चित्रपटाचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 

हा व्हिडिओ अक्षयच्या 'बाला' भूमिकेतील आहे. सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या 'बाला' चॅलेंजने चांगलाच जोर धरला आहे. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. खुद्द अक्षयने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रोमो शेअर केला आहे.

२६ ऑक्टोबर रोजी हा विनोदी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय शिवाय चित्रपटात रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची एकत्र मेजवाणी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.