प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग. व्हिडिओ होतोय व्हायरल सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा हिचा निक जोनाससोबत व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर निकसोबत बेसबॉल मॅच पाहण्यासाठी ती आल्याचे दिसत आहे.

Updated: May 30, 2018, 03:34 PM IST
प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग, व्हिडिओ होतोय व्हायरल title=
Pic - Twitter

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती नेहमी अनेक फोटो तसेच व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत राहिली आहे. कधी कार्यक्रमाच्यामाध्यमातून चर्चेत असते. कधी रिलेशनशिपच्या वृत्तावरुन चर्चेत होती. कधी लग्नाच्या विषयावरुन. मात्र, यावेळी ती कोणासोबत डेटिंग करीत असल्याचे वृत्त हाती आलेय. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अमेरिकेतील डेलीच्या वृत्तानुसार प्रियंका अमेरिकन अभिनेता निक जोनास सोबत डेट करत आहेत.

तिचा सोशल मीडियावर निक जोनाससोबत व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर निकसोबत बेसबॉल मॅच पाहण्यासाठी ती आल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ एका चाहत्याने शूट केलाय. दरम्यान, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या प्रियंकाने निकसोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर अपलोट केलेला नाही. तशी तिने खबरदारी घेतली. मात्र, तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. निकसोबत ती स्टेडियममध्ये येताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओसोबत काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात फोटोतही प्रियंका निकसोबत दिसत आहे. दरम्यान, या वृत्ताला दोघांकडून दुजोरा मिळालेला नाही.