मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं आहे. हे कपल दुस-या मुलाची तयारी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रियांका आणि निक दोघंही भाऊ-बहिणीचं महत्त्व मानतात आणि त्यांची मुलगी मालती मेरीसाठीही त्यांची हीच इच्छा आहे. मात्र, यासाठी ते याची घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. या स्टार जोडप्याला भरपूर मुलं हवी आहेत.
वयाचा फरक नकोय
एका रिपोर्टनुसार, सूत्राने न्यूज पोर्टलला पुढे सांगितलं आहे की, निकला त्यांच्या मुलांमध्ये वयाचं जास्त अंतर नसावं अशी इच्छा आहे. त्यांच्या मुलांनी त्यांचे भाऊ केविन जोनास आणि जो जोनास यांच्या वयाच्या जवळ असावं अशी त्यांची इच्छा आहे. कथितरित्या जोनास बंधूंना त्यांची मुलं सख्या भावंडांसारखीच हवी आहेत आणि त्यांना चुलत भाऊ किंवा चुलत बहिणी अशा भावंडांसारखी नको आहेत. त्यांचे पालकही त्यांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
दुसऱ्या बाळाची योजना करण्याच्या मूडमध्ये
प्रियंका आणि निक जोनास यांनी अलीकडेच मालतीचे 'सिक्स मंथ बर्थडे सेलिब्रेशन'ही केलं. हा फोटो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे. मालतीला भाऊ-बहिणीची उणीव जाणवू द्यायची नाही, हे दोघंही या कपलच्या जवळून शिकले आहेत. त्यामुळे प्रियांका आणि निक सरोगसीतून दुसऱ्या बाळाची योजना करण्याच्या मूडमध्ये आहेत.