प्रेमाचा बहाणा दाखवत त्यानं...; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत जे घडलं ते भयावह

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 8, 2022, 09:37 AM IST
प्रेमाचा बहाणा दाखवत त्यानं...; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत जे घडलं ते भयावह  title=

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री  नित्या मेनन (Nithya Menon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ब्रीद इन्टू द शॅडो’मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत नित्या दिसली होती. नित्याचा जन्म बेंगळुरूतील एका मल्याळम कुटुंबात झाला. अभिनेता सिद्धार्थसोबत 180 या चित्रपटातून तिनं तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आता ती धनुषसोबत तिरुचित्रंबलममध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी संतोष वर्के (Santhosh Varkey) नावाच्या एका व्यक्तीनं म्हटलं होतं की त्याला नित्या खूप आवडते आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. यामुळे नित्या लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती. या चर्चांनंतर नित्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट करत स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं. या व्हिडीओत लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही असं नित्यानं सांगितलं होतं. आता प्रमोशमध्ये व्यस्त असलेल्या नित्याला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संपोष वर्के तिचा मानसिक छळ करत असल्याचा खुलासा नित्यानं केला आहे. 

संतोषनं प्रेमाचा बहाणा करत नित्याला त्रास दिल्याचं तिनं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना नित्यानं हा धक्कादायक खुलासा केला आहे. 'संतोष वर्के हा गेल्या 6 वर्षांपासून माझ्या प्रेमात आहे, असं सांगून मला त्रास देत होता. तो मला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत होता. त्यानं जवळपास वेगवेगळ्या 30 नंबरवरून मला फोन केले होते आणि मी सगळ्या नंबरला ब्लॉक केलं. संतोष मलाच नाही तर माझ्या वडिलांना आणि आईलाही फोन करून त्रास देत होता. त्यांनी खडसावल्यानंतरही संतोष सतत फोन करत राहिला. बऱ्याचवेळा अनेकांनी मला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा विचार करून मी दुर्लक्ष केलं. पण आता तो अतिरेक करत आहे', असं संतोषनं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे नित्या सतत बोलत राहिली की, 'तिनं संतोषनं फोन केलेल्या सगळे 30 फोन नंबर ब्लॉक करा असे आई-वडिलांना सांगितले.' दरम्यान, नित्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती शेवटी संपूर्ण भारतात हिट झालेल्या 'मेजर' चित्रपटात दिसली होती. ती सध्या काजोल आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सलाम वेंकी' चित्रपटाची दिग्दर्शिका म्हणून काम करत आहे. प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या 'मॉडर्न लव्ह हैदराबाद'मध्येही ती दिसली होती.