नोरा फतेहीच्या क्रॉप टॉपने वेधलं सर्वांचं लक्ष; दिलखेचक फोटोंमुळे चाहते घायाळ

यावेळी नोराने तिच्या भन्नाट डान्सने नाही तर अशा क्रॉप टॉपमुळे केलं चात्यांना घायाळ

Updated: Sep 15, 2021, 07:53 AM IST
नोरा फतेहीच्या क्रॉप टॉपने वेधलं सर्वांचं लक्ष; दिलखेचक फोटोंमुळे चाहते घायाळ

मुंबई : 'दिलबर' र्गल अभिनेत्री नोरा फतेही कामय तिच्या फिटनेसमुळे आणि डान्समुळे ओळखली जाते. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी नोरा नेटकऱ्यांना घायाळ करत असते. नोराच्या चाहत्यांच्या यादीत फक्त मुलांचा नाही तर तिच्या फॉशन सेन्समुळे मुली देखील तिला फॉलो करतात. नेहमी वेग-वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असेत. पण आता तिला डान्स क्लासमध्ये जाताना स्पॉट करण्यात आलं आहे. क्रॉप टॉपमधील फोटो सध्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. 

फिटनेस फ्रिक अभिनेत्री नोरा सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते. आता  देखील सोशल मीडियावर नोराच्या क्रॉप टॉपने इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  यावेळी नोराने तिच्या भन्नाट डान्सने नाही तर अशा क्रॉप टॉपमुळे चात्यांना घायाळ केलं. 

नोरा फतेहीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिलबर' आणि 'गर्मी' गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मन जिंकलं आहे. नुकताचं तिचा 'भुजः द प्राईड ऑफ इंडीया' प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नोराच्या अभिनयाने आणि डान्सने सर्वांच्या मनात राज्य केलं. चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री सोनाक्षीने देखील मुख्य भूमिका बजावली आहे.